AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यंकय्या नायडू नियमाने वागले, पण नियम आणि भावना वेगळ्या, शिवराय आमचं दैवत : संजय राऊत

महाराजांच्या नावे कुणीही राजकारण करु नये, असं उदयनराजे म्हणाले, त्यांत चुकीचं काही नाही", असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut answers to Udayanraje Bhonsle)

व्यंकय्या नायडू नियमाने वागले, पण नियम आणि भावना वेगळ्या, शिवराय आमचं दैवत : संजय राऊत
| Updated on: Jul 23, 2020 | 1:59 PM
Share

मुंबई : “महाराजांच्या नावे कुणीही राजकारण करु नये, असं खासदार उदयनराजे भोसले बोलले. त्यांनी काही चुकीचं म्हटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. जय शिवाजी जय भवानी घोषणेवरुन उफाळलेल्या वादावर उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sanjay Raut answers to Udayanraje Bhonsle)

“उदयनराजेंचा संवाद ऐकण्यात एक वेगळा आनंद आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कोणीही छत्रपतींच्या नावाने राजकारण करु नये. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नियमबाह्य किंवा घटनाबाह्य आहे असं कधीच वाटलं नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत. हा वाद वाढू नये, व्यंकय्या नायडू हे वरिष्ठ आहेत”, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut answers to Udayanraje Bhonsle)

वाचा : Udayanraje | महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले  

उदयनराजे माझ्यावर टीका करतात. त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, ते टीका करु शकतात. ते म्हणाले मी महान आहे, माझं मत आहे की छत्रपती महान आहेत ,आम्ही त्यांचे मावळे आहोत, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

“उदयनराजेंचं लॉजिक त्यांच्याजवळ राहू द्या, त्यांना वाटतंय की तिथे शरद पवार होते किंवा अन्य लोक होते तर आक्षेप घेतला नाही, तर ती उदयनराजेंची भावना, पण आता समाज माध्यमावरुन ते लोकांपर्यंत पोहोचलंय. जय भवानी, जय शिवाजी हे घटनाबाह्य आहे असं कधीच वाटलं नाही. जय शिवाजी या आमच्या भावना आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “जय भवानी, जय शिवाजी हे घटनाबाह्य आहे असं कधीच वाटलं नाही, लोकसभा-राज्यसभेत आम्ही या घोषणा दिल्या, जय शिवाजी हा आमचा मंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धरुन घोषणा दिल्या, व्यंकय्या नायडू काटेकोर, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहेत. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम इतकीच महत्त्वाची असं माझं मत आहे”

जेव्हा शिवसेनेविरोधात आंदोलन झालं, तेव्हा भाजप नेत्यांनी आपली भूमिका व्यक्त केली, आता का नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. व्यंकय्या नायडू हे नियमानेच वागले, कायदे माहिती असणारा सभापती आहे, आम्ही सर्वजण त्यांचे ऐकतो, मात्र जय शिवाजी या आमच्या भावना आहेत, छत्रपतींनी महाराष्ट्राला महान केलंय, असं संजय राऊत म्हणाले.

नियम आणि भावना वेगळ्या गोष्टी आहेत, अल्ला हू अकबरच्या घोषणाही दिल्या आहेत, त्या त्या राज्यातील नेत्यांनी तशा घोषणा दिल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या श्रद्धेचा विषय त्यामुळे मत व्यक्त केलंय, हे महाराष्ट्राचं मत आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा विषय नाही, विषय आहे जय शिवाजी, जय भवानीचा, त्यावरच बोलू, असं म्हणत, संजय राऊत यांनी शिवसेना भवनावरील बाळासाहेबांच्या फोटोचा प्रश्न टाळला.

जय शिवाजी, जय भवानी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे, सीमेवरील जवानही हा जयघोष करतात, उद्या तुम्ही वंदे मातरम, जय हिंदला आक्षेप घ्याल, ते चालणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

(Sanjay Raut answers to Udayanraje Bhonsle)

संबंधित बातम्या  

Udayanraje | महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले  

Jai Bhavani Jai Shivaji | छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत  

Jai Bhavani Jai Shivaji | व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी 

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.