आधी 3 गुणांनी संधी हुकली, आता 466 रँक, कोणताही क्लास न लावता यवतमाळच्या श्रीकांत मोडकने करुन दाखवलं !

वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्याने आपणही पोलीस खात्यात जाऊन सेवा करावी असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या श्रीकांत मोडकने शेवटी घवघवीत यश संपादन केले आहे. श्रीकांत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला असून या परीक्षेत त्याने 466 रँक मिळवला आहे.

आधी 3 गुणांनी संधी हुकली, आता 466 रँक, कोणताही क्लास न लावता यवतमाळच्या श्रीकांत मोडकने करुन दाखवलं !

यवतमाळ : वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्याने आपणही पोलीस खात्यात जाऊन लोकांची सेवा करावी असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या श्रीकांत मोडकने शेवटी घवघवीत यश संपादन केले आहे. श्रीकांत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला असून या परीक्षेत त्याने 466 रँक मिळवला आहे. लहानपणी बाळगलेले त्याचे स्वप्न आता साकार होताना दिसत आहे. श्रीकांतचे वडील एएसआय म्हणून नुकतेच निवृत्त झाले आहेत. मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्यामुळे ते समाधान व्यक्त करत आहेत. (yavatmal Shrikant Modak clear upsc got rank 466)

पाचव्या प्रयत्नमध्ये मिळविले यश

श्रीकांत याने खासगी कंपनीत नोकरीवर असताना यूपीएससीची परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला यश आले नाही. त्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे यूपीएससीचा अभ्यास करण्याचे ठरविले. ठऱल्याप्रमाणे त्याने यवतमाळ येथे एक वर्षे तयारी केली. त्यानंतर थेट दिल्ली गाठून यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. श्रीकांतने आतापर्यंत चार वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेली आहे. यामध्ये एकदा 3 गुण कमी मिळाल्यामुळे तो मुलाखतीपासून वंचित राहिला होता. मात्र जिद्द न सोडता श्रीकांतने पाचव्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुलाखतीपर्यंत पोचला. शेवटी मेहनतीच्या जोरावर सध्या लागलेल्या निकालामध्ये त्याला 466 रँक मिळाला आहे. आपल्याला आयपीएस हे केडर मिळेल असा त्याला विश्वास आहे.

ग्रामीण भागातून झाले शिक्षण

श्रिकांत मोडकचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुसद येथील कोषटवार महाविद्यालयातून झाले. तर बारावी लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातून पूर्ण केली. त्यानंतर इंजिनिअरिंग पुणे येथील सिंहगड महाविद्यालयातून तर एमटेकचे शिक्षण गुजरातमधील गांधीनगर येथून घेतले. लहानपणापासूनच हुशार असल्याने वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या मदतीने त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

सेल्फ स्टडीवर दिला भर

साधारणत: यूपीएससीची परीक्षा म्हणजे क्लासेस लावणे आणि त्यातून अभ्यास करणे हाच सर्वांचा समज असतो. मात्र कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टरी स्टडीज आणि लायब्ररीमध्ये अभ्यास आणि रिव्हिजन करुन श्रीकांतने हे यश संपादन केले आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये जे यूपीएससी टॉपर आहेत, त्यांनी जसा अभ्यास केला अगदी तसाच अभ्यास मीही केला. मी कुठलीही वेगळी पद्धत वापरली नाही, असे श्रीकांतने आपल्या यशावर बोलताना सांगितले.

इतर बातम्या :

UPSC Civil Services Main 2020 Result : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश, यंदा रँकमध्येही सरशी, उस्मानाबादच्या निलेशची गगनभरारी!

(yavatmal Shrikant Modak clear upsc got rank 466)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI