उच्च जात कोणती?… इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत विचारला थेट प्रश्न; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
यवतमाळ येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली जाते. मात्र, यावेळी हैराण करणारी गोष्ट घडली.

विवेक गावंडे यवतमाळ : यवतमाळ इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली होती. यात जवळपास 24 विद्यार्थी सराव करीत होते. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती. या टार्गेट पीक अप्सच्या आठवीच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या एक प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न चांगलाच वादाचे कारण बनण्याचा शक्यता आहे.
या प्रश्न ऑनलाइन प्रश्न पत्रिकेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत ‘उच्च जातीचे नाव काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यामुळे शिक्षकांमधून संताप उमटला असून, विद्यार्थ्यांच्या मनातून जातीय निर्मूलन कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रश्नासंदर्भात संबंधित संस्थेकडून प्रश्नाची ठेवण आणि भाषा चुकीची होती त्यामुळे त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले.
राज्यामध्ये सराव परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अधिकार परीक्षा परिषदेचा आहे. ही परीक्षा घ्यावी असा कुठलाही आदेश महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषदांना नाही. कुठलीही परीक्षा घ्यायची असेल तर संबधित विषयाच्या तज्ज्ञाकडून प्रश्नपत्रिका तयार करुन घेतली जाते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे, केली जातंय.
यवतमाळ जिल्हा परिषदेने त्यांच्या अखत्यारीत ही सराव परीक्षा घेतली. अशा प्रकारची कुठलीही सराव परीक्षा राज्य सरकारच्या वतीने घेतली जात नाही. जातीचा कुठेही उल्लेख होत नाही. मात्र, या परीक्षेमध्ये जातीचा उल्लेख करण्यात आला. खरं तर जेव्हा अशी परीक्षा घेतली जाते तेव्हा या सगळ्याची आधी तपासणी केली जाते मॉडरेटर हा प्रश्नपत्रिका तपासतो. आता जेव्हा हा पेपर समोर आला आहे, त्यामुळे या सगळ्याची चौकशीची करत आहोत, असे सांगण्यात आले. मात्र, या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.
