AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका झाडामुळे शेतकरी करोडपती! अशी लागली लॉटरी

A Tree Made Farmer Millionaire : एका झाडामुळे यवतमाळमधील शेतकरी करोडपती झाला. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल. काहींचा तर यावर विश्वास बसणार नाही. पण पुसद तालुक्यातील या शेतकर्‍याला एका झाडामुळे खरंच कोट्यवधींचा फायदा झाला आहे. काय आहे हे प्रकरण?

एका झाडामुळे शेतकरी करोडपती! अशी लागली लॉटरी
रात्रीतून शेतकरी कोट्याधीशImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 12:26 PM
Share

यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकर्‍याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले. ही बाब कुणाच्याही पचनी पडणार नाही . मात्र हे सत्य आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका शेतकर्‍याची. केशव शिंदे असं या शेतकर्‍याचे नाव आहे. एका वडिलोपार्जित झाडामुळे त्यांना अचानक ही लॉटरी लागली. न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचे मूल्यांकन काढले तेव्हा ते 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली नी एकच गजहब उडाला.

काय आहे प्रकरण?

केशव शिंदे यांच्या 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. 2013 — 14 पर्यंत हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013 14 मध्ये रेल्वे खात्याने एक सर्वे केला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते. त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असल्याचे आणि त्याचे मूल्य समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करत होते.

त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगी संस्थेकडून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये असल्याचे समोर आले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढले . मात्र ते जास्त असल्याने रेल्वे त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले.

नागपूर खंडपीठात 1 कोटी जमा

शंभर वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे एक कोटी रुपयाची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली त्यातील 50 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी नागपूर खंडपीठाने दिली. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची शेत जमीन संपादित करण्यात आली आहे. मूल्यांकनानंतर उर्वरित रक्कम शेतकर्‍याला मिळेल. याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेतून 8 फेब्रुवारी 2018 रोजी पारित केलेल्या मोबदला रद्द करावा आणि लाल चंदनाचे वृक्ष व इतर वृक्षाविषयीचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर एक कोटी रूपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयात दिली .

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.