Yavatmal Murder | शेतीच्या हिस्सावरून भाऊबंदकीत वाद; यवतमाळात लहान्याने पाडला मोठ्याचा मुडदा, चाकूने सपासप वार

दोघांतही चांगलीच बाचाबाची झाली. याचे पर्यावसान चाकू काढण्यापर्यंत गेले. राहुल हा मोठा भाऊ. सतीश हा लहान भाऊ. या वादात सतीशने म्हणजे लहान भावाने राहुलवर म्हणजे मोठ्या भावावर चाकूने सपासप वार केले.

Yavatmal Murder | शेतीच्या हिस्सावरून भाऊबंदकीत वाद; यवतमाळात लहान्याने पाडला मोठ्याचा मुडदा, चाकूने सपासप वार
यवतमाळात खुनाच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त, बाजूला मृतक राहुल बाचलकर. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 4:38 PM

यवतमाळ : शेती हिस्से वाटणीच्या कारणातून लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून केला. ही घटना यवतमाळ शहरातील मालीपुरा (Malipura) भागात सकाळी अकरा वाजता घडली. माळीपुरा येथील राहुल मनोहर बाचलकर (Rahul Bachalkar) (वय 36 ) असे मृतकाचे नाव आहे. मृतक व लहान भावात नेहमीच शेतीच्या हिस्से वाटपाच्या कारणावरून वाद होत होते. आज सकाळी याच कारणावरून मृतक राहुल मनोहर बाचलकर यांच्यासोबत वाद झाला. यात लहान भावाने चाकूने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपी सतीश मनोहर बाचलकर (वय 30 वर्षे) पोलिसांच्या ताब्यात आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस (Yavatmal City Police) ठाणे करीत आहे.

अशी घडली घटना

मालीपुऱ्यात राहणारे राहुल आणि सतीश बाचलकर हे दोन भाऊ. यांच्या शेतजमिनीच्या हिस्स्यावरून वाद होता. हा वाद आज सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा उभाळून आला. दोघांतही चांगलीच बाचाबाची झाली. याचे पर्यावसान चाकू काढण्यापर्यंत गेले. राहुल हा मोठा भाऊ. सतीश हा लहान भाऊ. या वादात सतीशने म्हणजे लहान भावाने राहुलवर म्हणजे मोठ्या भावावर चाकूने सपासप वार केले.

घटनास्थळी विदारक चित्र

घटना घडली त्याठिकाणी रक्त सांडलेलं होतं. मृतकाचं शरीर शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलं. आरोपीला यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. कुटुंबातील एकाचा मुडदा पडाल्यानं तणावाचं वातावरण होतं. रडण्याचा आवाज ऐकू येत होता. शेतीचा छोटासा तुकडा कमी-जास्त झाला. तरी यातून असा वादाच्या घटना घडतात. अशीच विदारक ही घटना. छोट्याशा कारणातून शेवटी एक जीव गेला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.