Yavatmal bus | यवतमाळात मद्यधुंद वाहक बसमध्ये लोळला, अतिरिक्त तिकीट कापल्याने प्रवासी संतप्त, प्रकरण पोलिसांत

वाहतूक नियंत्रक कुणाल चौधरी यांनी यासंदर्भात तक्रार केली. आर्णी रोडवरील नवीन बसस्थानक परिसरातील ही घटना आहे. तक्रारीनुसार, राजुरा आगारातील वाहक अक्षय बट्टे मद्य पिऊन कामावर आहे. तो बसमध्येच दारू पिऊन पडलेला आहे.

Yavatmal bus | यवतमाळात मद्यधुंद वाहक बसमध्ये लोळला, अतिरिक्त तिकीट कापल्याने प्रवासी संतप्त, प्रकरण पोलिसांत
यवतमाळात मद्यधुंद वाहक बसमध्ये लोळला
Image Credit source: tv 9
विवेक गावंडे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 30, 2022 | 1:10 PM

यवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावर राजुरा-अमरावती एसटी (Rajura-Amravati ST) बसच्या मद्यधुंद वाहकाने चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बसमध्ये बसलेले प्रवासीदेखील या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले. अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव आहे. तो एवढा दारू प्यायला होता की प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी चक्क 800 रुपयांचे तिकीट त्याने फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळमध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस (Avadhutwadi Police) ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने (Traffic Controller) तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र त्याचा प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

सुरक्षा रक्षकाने बसमधून उतरविले

व्यवसाय वाहतूक नियंत्रक कुणाल चौधरी यांनी यासंदर्भात तक्रार केली. आर्णी रोडवरील नवीन बसस्थानक परिसरातील ही घटना आहे. तक्रारीनुसार, राजुरा आगारातील वाहक अक्षय बट्टे मद्य पिऊन कामावर आहे. तो बसमध्येच दारू पिऊन पडलेला आहे. हा वाहक वाहनाच्या मध्यभागात बसमध्ये पडलेला होता. त्याच्या शरीरातून दारुचा वास येत होता. प्रवाशांनीही त्याची तक्रार केली. त्यांचे उरलेले पैसेही त्याने परत केले नव्हते. अक्षयला उठविण्याच प्रयत्न केला. पण, तो उठण्याच्या मनःस्थितीत नव्हता. सुरक्षा रक्षकाने शेवटी त्याला खाली उतरविले. कामावर असताना नशेत असल्यानं कारवाई करावी, अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली.

प्रवाशांकडून घेतले अतिरिक्त पैसे

वाहतूक नियंत्रकांनी अक्षयला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. पण, तो नशेत असल्यानं काही हलला नाही. शेवटी सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आलं. त्यानं वाहकाला उचलून खाली उतरविले. शेवटी वाहकाला खाली उतरवून प्रवाशांना सोडण्यात आले. तोपर्यंत प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही जणांचे उर्वरित पैसे न दिल्यानं ते संतप्त झाले होते.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें