AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर थेट लोकायुक्तांकडे तक्रार… अनिल परब यांनी घेतला मोठा निर्णय; आंदोलनाचाही इशारा

ठाकरे गटाचे अनिल परब यांनी शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहारांविरोधात लोकायुक्तांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांची हकालपट्टी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परब यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर थेट लोकायुक्तांकडे तक्रार... अनिल परब यांनी घेतला मोठा निर्णय; आंदोलनाचाही इशारा
| Updated on: Oct 09, 2025 | 12:55 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात जोरदार टीका केली. योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहारांची आणि गुन्हेगारांना मदत करण्याच्या प्रकरणांची तक्रार घेऊन थेट लोकायुक्तांकडे जाणार असल्याचा मोठा निर्णय अनिल परब यांनी जाहीर केला आहे. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते मुंबईत बोलत होते.

अनिल परब यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी योगेश कदम यांच्याविरोधात जोरदार टीका केली. यावेळी अनिल परब यांनी सचिन घायवळप्रकरणीही भाष्य केले. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार आहात? जे आईच्या नावाने डान्सबार चालवतात. मुली नाचवून जे लोक भाडे खातात, दलालीचं काम करतात. गँगस्टर लोकांना पोसण्याचं काम करत आहेत. अधिकृत शस्त्र परवाने या गँगस्टर लोकांना देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून असे मंत्री का आहेत, त्यांची कोणती अडचण आहे हे समजत नाहीये? असा सवाल अनिल परब यांनी केला.

योगेश कदमची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही

या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. योगेश कदमची हकालपट्टी करा. अधिवेशनात आवाज उठवूच, पण रस्त्यावर उतरू. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम जाहीर करू. योगेश कदमची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असेही अनिल परब म्हणाले.

या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे योगेश कदमची हकालपट्टी करा. अधिवेशनात आवाज उठवूच, पण रस्त्यावर उतरू. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम जाहीर करू. योगेश कदमची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. योगेश कदम यांच्यावर कारवाईसाठी पहिली संधी मुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे. मात्र, जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, तर मग पुढील पाऊल उचलली जातील, असेही अनिल परब म्हणाले.

मी लोकायुक्तांकडे जाणार

योगेश कदम यांचे डान्सबार, वाळूचोरी आणि अन्य प्रकरणं घेऊन मी लोकायुक्तांकडे जाणार आहे. तसेच, कोर्टात जाणार आहे. कोर्टाने चूक दुरुस्त करावी. अन्यथा मला कोर्टात जाण्यावाचून पर्याय राहणार नाही. पोलिसांचा रिपोर्ट आहे. तो गुंड आहे. गुंडाचा भाऊ आहे. समाजविरोधी कृत्यात तो आहे. म्हणून आम्ही परवाना नाकारत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी नाकारला त्याच ग्राऊंडवर (आधार) कदम यांनीही परवाना नाकारायला हवा होता, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.