नवी दिल्ली– गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉईन, ट्रोन (TRX), इथेरियम (Ethereum) आणि रिपल XRP हे ट्रेंडीगमध्ये दिसून येत आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत आज (शनिवारी) तेजीचं वातावरण दिसून आलं. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 2.05 ट्रिलियन डॉलर वर राहिला. कालच्या तुलनेत 0.53 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. क्रिप्टो मार्केट वॉल्यूम गेल्या 24 तासांत 16.66 टक्क्यांच्या घसरणीसह 84.28 अरब डॉलरवर पोहोचला. DeFi मध्ये एकूण वॉल्यूम सध्या 12.76 डॉलर आहे. सर्व स्थिर कॉईन्सचा वॉल्यूम (COINS VOLUME) सध्या 67.57 अरब डॉलर आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनची (BITCOIN) सध्याची किंमत 34 लाख रुपये आहे. त्याचा प्रभाव 39.56 टक्के इतका आहे. मागील दिवसाच्या तुलनेत 0.14 टक्क्यांहून कमी आहे.