AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, ‘अशी’ आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड

कमी व्याजदर असलेले गृह कर्ज मिळवण्यासाठी कर्ज हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. 15 वर्षांकरिता 20 लाख रुपयांच्या गृह कर्जाच्या व्याजामध्ये अर्धा टक्के जरी कपात झाली आणि ही रक्कम गुंतवणूक केल्यास ग्राहकाला 1 लाख 20 हजार रुपयांचा थेट फायदा होतो.

गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, 'अशी' आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड
एसबीआय लोन/प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 1:47 PM
Share

जर तुम्हाला कमी व्याजदराचे गृह कर्ज (Home Loan) मिळत असेल तर ही संधी तुम्ही सोडू नका. कारण व्याजदरात केवळ अर्धा टक्के कपात तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते आणि 6 EMIपर्यंत परतफेड मिळू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्ज हस्तांतरण करण्याची अशीच एक व्यावहारिक आकडेमोड ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

काय आहेत अटी व शर्ती? SBIने उदाहरणादाखल ही आकडेमोड केली आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांकरिता 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यासाठी संबंधित बँक 10 टक्के व्याज आकारत आहे. अशावेळी SBI गृहकर्जावर 9.5 टक्के व्याज आकारत असेल तर त्याचा किती फायदा होऊ शकतो, याची आकडेमोड एसबीआयने केली आहे.

काय आहे बँकेची रणनीती? बँकेने ग्राहकाचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठीची रणनीती आखली आहे. त्यामध्ये थेट फायदा आणि गुंतवणुकीनंतरचा फायदा अशा दोन्ही पद्धती बँकेने विशद केल्या आहेत. खरेतर वीस लाखांच्या रकमेवर अर्धा टक्का व्याजदर कमी होण्याचा प्रभाव फार मोठा दिसून येत नसला तरी यातून बचत होणाऱ्या रकमेची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास ग्राहकांना खूप मोठा फायदा मिळू शकतो. बँकेने नेमक्या याच पद्धतीवर जोर दिला आहे.

काय आहे बँकेचे व्यावहारिक धोरण? 20 लाख रुपयांच्या गृहकर्जावर दहा टक्के व्याज दराने मासिक हप्ता 21 हजार 492 रुपये येईल. तर व्याजदर 9. 50 टक्के झाल्यास मासिक हप्ता 20 हजार 945 रुपये येईल. म्हणजे प्रत्येक मासिक हप्ता मागे तुम्हाला 547 रुपयांचा फायदा होईल. पूर्ण कालावधीचा अंदाज घेता संपूर्ण कर्जावर या आकडेमोड नुसार तुमचा 98 हजार 482 रुपयांचा फायदा होईल. यामध्ये गृहकर्ज हस्तांतरीत करण्याचे प्रक्रिया शुल्क व इतर खर्च मिळून 15 हजार रुपये खर्च गृहीत  धरला तरी ग्राहकाचा 83 हजार 482 रुपयांचा निव्वळ नफा होईल.

बचतीची रक्कम गुंतवणूक केल्यास होणारा फायदा

बँकेने बचतीचा फंडा सांगितलं तसेच त्याचे फायदे ही सांगितले, परंतु हीच रक्कम जर मुदत ठेवींमध्ये गुंतवल्यास ग्राहकाला कमाईचे  साधन प्राप्त होते.  हप्त्यांमध्ये बचत झालेली रक्कम मुदत ठेवी मध्ये गुंतवल्यास आणि सध्याच्या 4 टक्के व्याजदराचा विचार करता ही गुंतवणूक 135090 रुपये होईल. यातून प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्च मिळून 15 हजार रुपयांचा खर्च वजा करता निव्वळ नफा 120000 रुपये होईल.

किती द्यावं लागेल शुल्क? सर्वात अगोदर तुमच्या जुन्या बँकेतील गृहकर्जाचे रक्कम नवीन बँकेतील गृह कर्जात जमा करावी लागते. जर ग्राहकाने त्याच्या जुन्या बँकेकडून निश्चित व्याज दर ठरवून गृह कर्ज घेतले असेल तर गृहकर्ज हस्तांतरित करताना कर्जाच्या उर्वरित रकमेवर दोन टक्के रक्कम जमा करावी लागते. गृहकर्ज हस्तांतर करण्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही नवीन बँकेकडून गृहकर्ज घेत आहात. त्यामुळे नवीन बँक तुमच्याकडून या गृहकर्जाच्या प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग शुल्क आकारेल.

किती वेळा गृहकर्ज हस्तांतरित करता येते? ग्राहक त्याला वाटेल तोपर्यंत गृहकर्ज हस्तांतरित करू शकतो. परंतु फार अडचणीच्या काळात अथवा फार मोठा फायदा होत असेल तर ग्राहकाने गृहकर्ज हस्तांतरित करणे सोयीस्कर ठरेल. जेव्हा तुम्ही गृहकर्ज हस्तांतरित करत असाल त्या प्रत्येक वेळी तुम्हाला याप्रकरणी दंड द्यावा लागेल आणि प्रक्रिया शुल्क सुद्धा जमा करावे लागेल. अनेक वेळा गृहकर्ज हस्तांतरित करण्याची तुमची योजना तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते दंड आणि शुल्काचा रकमेमुळे तुम्हाला व्याज वाचवण्याची खटाटोप फायदेशीर ठरणार नाही.

करून ठेवावे लागते शुल्क व दंड रकमेची तजवीज बॅलन्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया फार वेळखाऊ असून त्यासाठी अनेक कागदपत्रांची तजवीज करून ठेवावी लागते ग्राहकाला या संपूर्ण प्रक्रियेत धावपळ करावी लागते आणि प्रक्रिया शुल्क व दंड रकमेची तजवीज करून ठेवावे लागते. गृह कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीलाच ग्राहकाला हप्त्यापोटी मोठी रक्कम चुकवावी लागते त्यामुळे सुरुवातीच्या काळातच गृहकर्ज हस्तांतर करण्याची प्रक्रिया फायदेशीर ठरू शकत नाही.

जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?

ICICI बँकेचं ‘डिजिटल’ पाऊल: कस्टम ड्युटी ऑनलाईन, घरबसल्या करा पेमेंट!

शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.