AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

State Bank of India : स्टेट बँकेच्या IMPS शुल्कात बदल, 1 फेब्रुवारीपासून नवे नियम!

IMPS ही बँकांद्वारे प्रदान केली जाणारी लोकप्रिय पेमेंट सेवा आहे. ज्याद्वारे वास्तविक वेळेत बँक अंतर्गत पैसे हस्तांतरण करणे सुलभपणे शक्य ठरते. रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांसहित 24×7 उपलब्ध असलेली सेवा आहे.

State Bank of India : स्टेट बँकेच्या IMPS शुल्कात बदल, 1 फेब्रुवारीपासून नवे नियम!
स्टेट बँक ऑफ इंडिया
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 12:20 AM
Share

नवी दिल्ली : स्टेट बँक आॕफ इंडियाने (State bank of India) पैसे हस्तांतरणाच्या सेवेत वाढ केली आहे. तत्काळ पैसे हस्तांतरित करण्याच्या IMPS सेवेच्या मर्यादेत स्टेट बँकेने नव्या श्रेणीचा समावेश केला आहे. स्टेट बँकेच्या वेबसाईटनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांत नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. रुपये 2 लाख ते 5 लाख नवी श्रेणी असणार आहे. IMPS द्वारे 2 ते 5 लाखांदरम्यान पैसे पाठविण्यावर 20 रुपये अधिक जीएसटी याप्रमाणे शुल्क आकारणी केली जाईल.

IMPS ही बँकांद्वारे प्रदान केली जाणारी लोकप्रिय पेमेंट सेवा आहे. ज्याद्वारे वास्तविक वेळेत बँक अंतर्गत पैसे हस्तांतरण करणे सुलभपणे शक्य ठरते. रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांसहित 24×7 उपलब्ध असलेली सेवा आहे.

IMPS म्हणजे काय?

IMPS (Immediate Payment Service) : यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु करण्यात आली.

भारतात आॕनलाईन पद्धतीने एका क्षणात आर्थिक व्यवहार करता येतात. पैसे पाठविण्याच्या पद्धती विभिन्न आहेत. आॕनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या तीन पद्धती आहेत. IMPS (आयएमपीएस), एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS) यांचा समावेश होतो. नॕशनल पेमेंट काॕर्पोरेशनच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांचे संनियंत्रण केले जाते.

IMPS सुविधा अंमलबजावणी ?

IMPS सुविधा वापरासाठी IMPS सुविधा पुरविणाऱ्या बँकेतील खात्यास मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो व बँकेकडून MMID प्राप्त करावा लागतो. IMPS सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर बँकेकडून 7 अंकी क्रमांक देण्यात येतो त्याला MMID (Mobile Money Identifier) संबोधले जाते.

अन्य बँकेमधून IMPS मार्फत रक्कम मागविण्यासाठी, IMPS नोंदणीवेळी बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व बँकेमधून मिळालेला MMID रक्कम पाठविणाऱ्यासोबत सामायिक करावा लागतो. साधारणतः बँकांमध्ये IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाईलवर वापरण्यासाठी Application उपलब्ध करून दिली जाते आहे.

आयएमपीएस: पाच लाख

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आयएमपीएस बाबत महत्वाचा खुलासा केला होता. ग्राहक प्रति दिवस 5 लाखांपर्यंतचे व्यवहार करण्यास सक्षम असणार आहेत. पूर्वी केवळ 2 लाख रुपयांच्या व्यवहाराची मर्यादा होती.

इतर बातम्या :

Mumbai Corona Update : मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे नियम?

‘आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.