AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजपचे युतीसाठी 5 फॉर्म्युले

मुंबई: भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी बिहारमध्ये जागावाटप करुन रणशिंग फुंकलं आहे. बिहारमध्ये भाजपने एक पाऊल मागे घेत जिंकलेल्या 22 पैकी केवळ 17 जागाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात भाजप शिवसेनेसोबत कोणता फॉर्म्युला अवलंबणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे भाजप शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने एकला चलो रेचा नारा […]

शिवसेना-भाजपचे युतीसाठी 5 फॉर्म्युले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

मुंबई: भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी बिहारमध्ये जागावाटप करुन रणशिंग फुंकलं आहे. बिहारमध्ये भाजपने एक पाऊल मागे घेत जिंकलेल्या 22 पैकी केवळ 17 जागाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात भाजप शिवसेनेसोबत कोणता फॉर्म्युला अवलंबणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे भाजप शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना-भाजपमध्ये 5 फारम्युल्यांवर चर्चा सुरु आहे.

फॉर्म्युला नंबर 1 – 155 जागा

शिवसेनेच्या मते, भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबतच घ्याव्या. तसंच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 288 पैकी 155 जागा द्याव्या, तरच भाजपसोबत युती होऊ शकते.

फॉर्म्युला नंबर 2 – मुख्यमंत्रीपद

शिवसेना सूत्रांच्या मते, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 50-50 चा फॉर्म्युला असावा. विधानसभेच्या 288 पैकी 144 शिवसेनेने तर भाजपनेही 144 जागा लढवाव्या. मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील.

फॉर्म्युला नंबर 3 –

भाजप 50-50 च्या फॉर्म्युलाबाबत तयार आहे, मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही समझोत्याला तयार नाहीत.

फॉर्म्युला नंबर 4 –

शिवसेना विधानसभेच्या 151 जागा, तर भाजप 137 जागांवर निवडणूक लढवेल. ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होईल.

फॉर्म्युला नंबर पाच

दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवेल. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्ष असेल. म्हणजे भाजप अडीच आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांसाठी असेल.

हे पाच फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. दोन्ही पक्ष यापैकी कोणता फॉरम्युला स्वीकारणार हे येत्या काळात समजेल. मात्र सध्या शिवसेनेचा पवित्रा आणि पाच राज्यातील निवडणुकांतील भाजपची स्थिती पाहता, वादाची ही गाठ सहजासहजी सुटेल असं वाटत नाही.

वाचा: लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप 5 जागा हरली!

भाजपचा सर्व्हे

दरम्यान, यापूर्वी भाजपने केलेल्या गुप्त सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती झाली नाही, तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसेल, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

भाजपचा सध्याचा अंतर्गत सर्व्हे भाजपने नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने युती केल्यास त्यांना 30 ते 34 जागा मिळू शकतात. मात्र जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 15 ते 18 आणि शिवसेना केवळ 5 ते 8 जागा जिंकेल. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला 22 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

लोकसभा 2014 चा निकाल

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शिवसेना-भाजप युतीने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेने 18 आणि भाजपने तब्बल 22 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती.

संबंधित बातम्या 

भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड   

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप 5 जागा हरली!  

त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!  

एनडीएने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, बिहारमध्ये जागावाटप झालं!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा