...म्हणून अमित ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक

मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला मनसेने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आझाद मैदानावर उपस्थित होते.

...म्हणून अमित ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चानंतर आझाद मैदानाची साफ-सफाई करणाऱ्या मनसैनिकांचं मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी कौतुक केलं (Amit Thackeray Appreciates MNS Supporters). मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला मनसेने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आझाद मैदानावर उपस्थित होते. आता इतक्या मोठ्या संख्येने लोक असल्यावर मैदानावर कचरा होणारच. मात्र, मोर्चा संपल्यानंतर मनसैनिकांनी तो संपूर्ण परिसर स्वच्छ केला. याबाबत अमित ठाकरे यांनी मनसैनिकांचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट केली आहे (Amit Thackeray Facebook Post).

मनसेने बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला. यावेळी संपू्र्ण महाराष्ट्रातून मनसैनिक मुंबईकत आले होते. हजारोंच्या संख्येने मनसैनिक आझाद मैदानावर जमले होते. राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक आपआपल्या शहरात-गावात निघून गेले. मात्र, यापैकी काही मनसैनिकांनी आझाद मैदानाचं स्वच्छता अभियान हाती घेतलं आणि संपूर्ण आझाद मैदान स्वच्छ केलं.

यानंतर अमित ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट फेसबुकवर टाकली. यामध्ये त्यांनी मनसैनिकांचं कौतुक केलं आहे. “आझाद मैदान येथील सभेनंतर तो संपूर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम..!!!”, अशा आशयाची पोस्ट अमित ठाकरे यांनी केली.

अमित ठाकरेंची राजकारणात एण्ट्री

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं. तेव्हापासून ते राजकारणात अधिकृतपणे सक्रिय झाले आहेत.

मनसेच्या मोर्चात राज ठाकरेंची तोफ धडाडली

“ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *