Lockdown : 50 जणांची अनधिकृत वाहतूक, ट्रक चालकावर गुन्हा

या ट्रकच्या पुढे 'अतिआवश्यक सेवा' असा बोर्ड लावलेला होता. हा ट्रक मुंबई ते लखनऊ जाणार होता.

Lockdown : 50 जणांची अनधिकृत वाहतूक, ट्रक चालकावर गुन्हा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात सध्या लॉकडाऊन (Lockdown) आहे. त्यामुळे कुणालाही एका (Ban on Travel) जागेहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. मात्र, तरीही काही जण बेकायदेशिररित्या वाहतूक करत असल्याचं समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी अशाच एका ट्रकला ताब्यात घेतलं आहे. या ट्रकमधून तब्बल 50 लोकांनी वाहतूक केली जात होती. मुंबई पोलिसांनी अनाधिकृतरित्या (Ban on Travel) लोकांची वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे.

या ट्रकच्या पुढे ‘अतिआवश्यक सेवा’ असा बोर्ड लावलेला होता. हा ट्रक मुंबई ते लखनऊ जाणार होता. या ट्रकमधून प्रवास करत असलेल्या लोकांकडून प्रत्येकी तब्बल 2 ते 3 हजार रुपये घेतले जात होते.

या प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला आहे. तर ट्रक चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी आणि इतर कायद्याअंतर्गत (Ban on Travel) त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तर या ट्रकमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना चौकशीनंतर सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 635 वर येऊन पोहोचली आहे . या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली.

कोरोनाचे राज्यात कुठे किती रुग्ण?

 • मुंबई – 377
 • पुणे (शहर व ग्रामीण) – 82
 • सांगली – 25
 • ठाणे मंडळ – 77
 • नागपूर – 17
 • अहमदनगर – 17
 • यवतमाळ – 4
 • लातूर – 8
 • बुलडाणा – 5
 • सातारा – 3
 • औरंगाबाद – 3
 • उस्मानाबाद – 3
 • कोल्हापूर – 2
 • रत्नागिरी – 2
 • जळगाव – 2
 • सिंधुदुर्ग – 1
 • गोंदिया – 1
 • नाशिक – 1
 • वाशीम – 1
 • अमरावती – 1
 • हिंगोली – 1
 • इतर राज्य  (गुजरात) – 1
 • एका रुग्णाच्या पत्त्याची खातरजमा करण्याचं काम सुरु आहे

Ban on Travel

संबंधित बातम्या :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *