एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार का; छगन भुजबळांचे सूचक हास्य

पडद्यामागे सुरु असलेल्या घडामोडी पाहता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. | Eknath Khadse joining NCP

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार का; छगन भुजबळांचे सूचक हास्य
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:49 PM

मुंबई: भाजपमध्ये बराच काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, पडद्यामागे सुरु असलेल्या घडामोडी पाहता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. (Chhagan Bhujbal reaction on speculation of Eknath Khadse joining NCP)

तरीही राष्ट्रवादीचे नेते अजून याबाबत जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी प्रसारमाध्यमांकडून याविषयी विचारणा झाली. यावर छगन भुजबळ सूचक हसले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार नाहीत असे नव्हे, अशी मोघम प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. एकूणच भुजबळ यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाची शक्यता नाकारलीही नाही. या सर्व घडामोडींवरून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागू शकते. राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या कोट्यातून खडसे यांना उमेदवारी दिली जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस केली जाईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भाजपकडून खडसे यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु, एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये परत जाण्याचे सर्व दोर कापून टाकल्याचे दिसत आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना फोनही केला होता. परंतु, खडसे यांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांना कळवले. देवेंद्र फडणवीस हाकेच्या अंतरावर येऊनही खडसे यांनी त्यांची भेट टाळली होती.

संबंधित बातम्या:

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा

17 ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना?; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवणार?

(Chhagan Bhujbal reaction on speculation of Eknath Khadse joining NCP)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.