AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CIDCO | सिडकोचा गृहकर्जदारांना दिलासा, हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ

लॉकडाऊनदरम्यान हफ्त्यांवर भरावे लागणारे विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. (CIDCO Waives Charges on Delayed Payment of Installments)

CIDCO | सिडकोचा गृहकर्जदारांना दिलासा, हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ
| Updated on: Jun 05, 2020 | 12:25 PM
Share

मुंबई : सिडकोने गृहकर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. लॉकडाऊनदरम्यान घरांच्या हफ्त्यांवर भरावे लागणारे विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. (CIDCO Waives Charges on Delayed Payment of Installments) सिडकोच्या या निर्णयामुळे हजारो सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे सिडको महामंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास उशीर होत आहे. मात्र त्यामुळे विलंब शुल्क भरावे लागते. पण आता हे विलंब शुल्क (DPC) पूर्णत: माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार 24 एप्रिल 2020 ते 31 मे 2020 या कालावधीतील विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्यात येणार आहे. जे अर्जदार 30 जून 2020 या अंतिम मुदतीपर्यंत सर्व हफ्ते सुरळीतपणे भरतील अशाच अर्जदारांना या विलंब शुल्क माफीचा लाभ घेता येणार आहे. (CIDCO Waives Charges on Delayed Payment of Installments)

कोरोनामुळे जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. भारतातहे 25 मार्चपासून पूर्णत: लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिडकोने यापूर्वीच आपल्या गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना घराचे हफ्ते भरण्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवर होणारा प्रतिकूल परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, टाळेबंदीच्या काळातील निर्बंध यांमुळे अर्जदारांना सदनिकेचे हफ्ते विहित मुदतीत भरण्यास अडचणी येत होत्या.

यामुळे टाळेबंदीच्या काळातील विलंब शुल्क माफ करावे, अशी मागणी या अर्जदारांकडून होत होती. या बाबींचा विचार करून, तसेच सदर अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील असल्याने वरील कालावधीतील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. तसेच ज्या अर्जदारांनी या कालावधीमध्ये विलंब शुल्क भरले आहे, अशा अर्जदारांचे विलंब शुल्क सदनिकेच्या उर्वरित शुल्कामध्ये समायोजित (ॲडजस्ट) करण्यात येणार आहे.

याचबरोबर येस बॅंकेचे पेमेंट पोर्टल 4 दिवस बंद असल्याने ज्या अर्जदारांना हफ्ता भरता आला नाही, अशा अर्जदारांचे त्या हफ्त्यावरील विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. सिडकोच्या या निर्णयाचा लाभ हजारो अर्जदारांना मिळणार असून सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.