अखेर नवी मुंबईतही पहिल्यांदाच मेट्रो धावली

तळोजा येथे कारशेडमध्ये (Navi Mumbai Metro one) हा कार्यक्रम झाला. यावेळी अल्प आणि आर्थिकदृष्टया दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार सिडकोच्या घरांसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला.

अखेर नवी मुंबईतही पहिल्यांदाच मेट्रो धावली

नवी मुंबई : अखेर नवी मुंबईतही पहिल्यांदाच मेट्रो धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्रमांक (Navi Mumbai Metro one) एक बेलापूर ते पेंधर मार्गीकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तळोजा येथे कारशेडमध्ये (Navi Mumbai Metro one) हा कार्यक्रम झाला. यावेळी अल्प आणि आर्थिकदृष्टया दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार सिडकोच्या घरांसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला.

बेलापूर ते पेंधर मार्ग क्र.1 नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाचं काम करण्यात आलं आहे. या 11 किमीच्या मार्गावर सिडकोतर्फे 11 मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रो एकूण 26.26 किमी असून याचे चार मार्ग आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 8 हजार 904 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेसंबंधी चित्रफित दाखवण्यात आली. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यासाठी 14 हजार 838 घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी 10 घरांचे ई-वाटप मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये 95 हजार घरे बांधण्यात येणार आहेत. यातील 9 हजार 249 अर्ज नोंदणीचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिडको माजी कर्मचारी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत निधीचा धनादेश देण्यात आला. शिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *