काँग्रेसला झटका, प्रियांका चतुर्वेदी 'मातोश्री'वर, शिवसेनेत प्रवेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. I am absolutely overwhelmed and grateful …

काँग्रेसला झटका, प्रियांका चतुर्वेदी 'मातोश्री'वर, शिवसेनेत प्रवेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.


महत्त्वाचं म्हणजे प्रियांका चतुर्वेदी या दिल्लीतून मुंबईत ‘मातोश्री’वर दाखल झाल्या. त्या शिवसेनेच्या संपर्कात असून आजच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षात गुंडगिरीला स्थान मिळत असल्याचा आरोप प्रियांका चतुर्वेदींनी कालच केला होता. त्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री राहुल गांधींकडे राजीनामा पाठवला. आज त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरुन काँग्रेस प्रवक्ता हटवून, कॉलमिस्ट-ब्लॉगर-मदर लिहिलं आहे. त्याआदी त्यांच्या प्रोफाईलवर ‘राष्ट्रीय प्रवक्ता काँग्रेस’ असं लिहिलं होतं. यापूर्वी त्या नेहमीच विविध चॅनेल्सवर काँग्रेसची बाजू मांडताना दिसत होत्या.

प्रियांका यांनी 17 एप्रिलला ट्विट करुन काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा सोपवला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खरंतर प्रियांका यांची नाराजी सप्टेंबर 2018 पासूनची आहे. त्यावेळी त्या मथुरेत राफेलबाबत पत्रकार परिषद घेत होत्या. त्यावेळी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी प्रियांकासोबत कथितरित्या गैरवर्तन केलं होतं. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र त्यांना पक्षाने पुन्हा प्रवेश दिला.

कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?

  • प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जाता
  • राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची बाजू मांडणारा महिला चेहरा म्हणून प्रियांका चतुर्वेदींची ओळख आहे.
  • त्यांनी अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणेम विविध चॅनेल्सवरील डिबेट शो मध्ये काँग्रेसची बाजू मांडली
  • तेहलका, डीएनए आणि फर्स्टपोस्ट यासारख्या दैनिकांमध्ये त्यांनी स्तंभ लिहिले आहेत.
  • विविध पुस्तकांवर प्रकाशझोत टाकणारा त्यांचा ब्लॉक नेटीझन्समध्ये लोकप्रिय आहे. पुस्तक समीक्षा
  • दोन एनजीओच्या माध्यमातून प्रियांका चतुर्वेदी यांनी शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्याबाबत काम केलं आहे
  • प्रियांका चतुर्वेदी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. त्यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. त्या मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचं प्राथमिक शिक्षण जुहू इथल्या सेंट जोसेफ शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण नरसी मोनजी कॉलेज विले पार्ले इथं झालं. विवाहित प्रियांका चतुर्वेदी यांना दोन मुलं आहेत.

काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रियांका चतुर्वेदी यांनी आपलं करिअर मीडिया, पीआर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालक म्हणून सुरु केलं. प्रियांका चतुर्वेदी यांनी 2010 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना 2012 मध्ये युवक काँग्रेसच्या उत्तर- पश्चिम मुंबईच्या सरचिटणीसपदाचा भार देण्यात आला. सोशल मीडियावर काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे, त्यांची मे 2013 मध्ये राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *