'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला रेल्वेतील पाणी प्यावं वाटणार नाही!

लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करताना तहान लागल्यावर आपण सहज मिनरल वॉटर असलेली पाण्याची बॉटल विकत घेतो आणि त्यातील पाणी पितो. मात्र ही बंद पाण्याची बॉटल तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरु शकते.

'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला रेल्वेतील पाणी प्यावं वाटणार नाही!

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करताना तहान लागल्यावर आपण सहज मिनरल वॉटर असलेली पाण्याची बॉटल विकत घेतो आणि त्यातील पाणी पितो. मात्र ही बंद पाण्याची बॉटल तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरु शकते. कारण नुकतंच बाटलीबंद पाण्याचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मिनरल वॉटर म्हणून विकत घेतलेली बॉटल ही रेल्वे स्थानकावरील साध्या नळाचे पाणी भरुन दिलेली असू शकते. धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

या व्हिडीओत एक मुलगा स्टेशनवरील नळाचे पाणी बाटल्यांमध्ये भरत आहे. त्यानंतर त्या व्यवस्थित सीलबंदही करताना दिसत आहे. कदाचित तो या पाण्याच्या बॉटल या मिनरल वॉटर बॉटल म्हणून विकत असल्याची शक्यताही अनेकांनी व्यक्त केली आहे.  मात्र यामुळे प्रवाशांची फसवणूक होत असल्याचेही यानिमित्ताने समोर येत आहे.

दरम्यान हा व्हिडीओ कोणत्या रेल्वे स्थानकावरील आहे, याची मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याधीही अशाचप्रकारे रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलमध्ये प्रवाशांना घाणेरड्या पाण्यात तयार केलेलं लिंबू सरबत देण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रं 7 वर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पोलिसांकडून तातडीने स्टॉल बंद केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *