वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन होऊनही मतदार यादीत नाव, जितेंद्र आव्हाडांचा संताप

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाय. दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या वडिलांचे नाव मतदारयादीत आहे. पण जिवंत असलेल्या अनेक लोकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे वडिलांचे निधन झाल्याचे कळवूनही त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण …

वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन होऊनही मतदार यादीत नाव, जितेंद्र आव्हाडांचा संताप

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाय. दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या वडिलांचे नाव मतदारयादीत आहे. पण जिवंत असलेल्या अनेक लोकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे वडिलांचे निधन झाल्याचे कळवूनही त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

मतदार यादीमधील नावे गायब होणे, मतदान केंद्रावरील असुविधा, अनेक ठिकाणी मशीनचा घोळ आणि रेंगाळलेली मतदान प्रक्रिया अशा सर्व त्रुटींचा सामाना करत ठाणेकरांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्हा लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 48.56 टक्के मतदान झाले असून गेल्या वर्षी 50.27 टक्के मतदान झालं होतं. 2014 च्या निवडणुकीत पालघर आणि ठाणे जिल्हा एक होता. यावेळी पालघर आणि ठाणे हे वेगवेगळे झाले आहे.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 1.71 टक्के मतदान कमी झाले असून याचा फायदा कोणाला होणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. विशेष करून कळवा-मुंब्रा विधासभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना असुविधांचा सामना करावा लागला. ठाण्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसन नगर येथील महापालिकेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विद्यालय आणि उमेदवार आनंद परांजपे यांनी बेडेकर विद्यालयमध्ये मतदान केलं. तर महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी सेंट जोन्स शाळेत मतदान केलं.

ठाण्यातील अनेक मतदारसंघात मतदारांची नावेच गायब असल्याचं आढळून येत होतं. मतदानासाठी घरातून निघालेल्या मतदारांना मतदान न करताच परतावे लागले. याद्या मागे याद्या शोधल्या , कार्यकर्त्यांची टेबले पालथी घातली तरीही अनेकांना नावे न सापडल्याने नाराज होत अखेर घरचा रस्ता पकडावा लागला. अनेक मतदारसंघात मतदान केंद्रासमोर तासंतास उभे राहून देखील मतदानासाठी असलेली रांग पुढे सरकत नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला. ठाणे पूर्व परिसरात कोपरी, पाचपाखाडी कळवा खारेगाव या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरु असल्याचे आढळून येत होते. तर अनेक ठिकाणी मतदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून मतदान न करताच घरी परतण्यात धन्यता मानली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *