AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला फटका, आता पावसाळा अधिवेशनावरही कोरोनाचं सावट

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एक आठवडा आधी गुंडाळालं होतं. (Maharashtra assembly Monsoon session Corona Pandemic) 

आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला फटका, आता पावसाळा अधिवेशनावरही कोरोनाचं सावट
विधानसभा अध्यक्ष
| Updated on: May 19, 2020 | 7:15 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवरच आधी अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा गुंडाळण्यात आलं होतं. त्यानतंर आता पावसाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजाबाबतचा निर्णय येत्या जून महिन्यातच होणार आहे. दरम्यान  महाराष्ट्र विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन येत्या 22 जूनपासून मुंबईत सुरु होणार आहे. (Maharashtra assembly Monsoon session Corona Pandemic)

मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी काल सोमवारी (19 मे) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चौथ्या लॉकडाऊनची मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आगामी पावसाळी अधिवेशन नियोजित 22 जूनपासून घ्यायचे की लांबणीवर टाकायचं, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नवनियुक्त 9 विधानपरिषद आमदारांचा सदस्यत्वाचा शपथविधी पार पडला. यानंतर संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती. या बैठकीबाबत तोंडी ठरलं होतं. मात्र त्या बैठकीसंदर्भात अधिसूचना विधानभवन सचिव कार्यालयातून काढण्यात आली नाही.

दरम्यान जर ही अधिसूचना रविवारी जारी केली असती, तरी देखील लॉकडाऊनमुळे कामकाज सल्लागार समितीमधील सर्व सदस्यांना बैठकीला कमी वेळात पोहोचण शक्य झालं नसतं.

त्यामुळे ही बैठक आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती विधानभवनातल्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनच्या कामकाजाबाबतचा निर्णय जून महिन्यात होणार आहे.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतलं हे दुसरे अधिवेशन आहे. गेल्या मार्च महिन्यातील राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एक आठवडा आधी गुंडाळालं होतं. (Maharashtra assembly Monsoon session Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

Lockdown 4.0 Guidelines | महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर

Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरु, काय बंद?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.