मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या

मुंबई : मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दूध विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ छेड काढल्यानंतर एका तरुणीने तक्रार दाखल केली होती. एसएनडीटी कॉलेजबाहेर 23 जुलै रोजी तक्रारदार तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत उभी होती. त्यावेळी आरोपी दूधवाला तिच्या जवळ आला आणि त्याने तिला नकोसा स्पर्श करुन पळ काढला. यानंतर तरुणीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार […]

मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 6:23 PM

मुंबई : मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दूध विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ छेड काढल्यानंतर एका तरुणीने तक्रार दाखल केली होती.

एसएनडीटी कॉलेजबाहेर 23 जुलै रोजी तक्रारदार तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत उभी होती. त्यावेळी आरोपी दूधवाला तिच्या जवळ आला आणि त्याने तिला नकोसा स्पर्श करुन पळ काढला. यानंतर तरुणीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

छेडछाडीची घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतच मालाड पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी 26 वर्षीय आरोपी नबी हुसेन शेखला अटक केली. नबी शेख हा कांदिवली भागातील एका तबेल्यात काम करतो.

पोलिसांच्या तपासात नबी शेखने एकापेक्षा अधिक तरुणींसोबत असा विकृत आणि किळसवाणा प्रकार केल्याचं समोर आलं. नबी शेखला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

नबी शेखवर अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, आणखी किती मुली त्याच्या या विकृतपणाला बळी पडल्या आहेत, या सर्व प्रकारचा तपास पोलिस करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.