विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दानचं आवाहन करावं : मंत्री अस्लम शेख

धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.(Minister Aslam Shaikh appeals to VHP came forward for organize plazma donation camp)

विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दानचं आवाहन करावं : मंत्री अस्लम शेख

मुंबई: कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनेआज एका मोर्चाचं आयोजन केले आहे. आजच्या घडीला धार्मिक स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का..? असा सवाल विहिंपला असल्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्र अस्लम शेख यांनी म्हटले आहे. (Minister Aslam Shaikh appeals to VHP came forward for organize plazma donation camp)

केंद्र सरकारने येवढ्या दिवसांमध्ये सर्व राज्यांसाठी धार्मिक स्थळं उघडण्याच्या बाबतीत आदर्श कार्यप्रणाली का नाही आखून दिली. धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडी सरकार धार्मिक स्थळं उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच महाविकासआघाडी या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करेल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं उघडण्यात येतील, असं अस्लम शेख म्हणाले. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप शेख यांनी केला.

सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन बाळगायचं आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत, हे पाहायला मिळंत, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपनं राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी अस्लम शेख यांनी भाजपनं अगोदर त्यांची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना धार्मिक स्थळ उघडण्याचा सल्ला द्यावा, असे सुचवले होते.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून धार्मिक स्थळं उघडण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या:

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना धार्मिकस्थळं उघडण्याचा सल्ला द्यावा; अस्लम शेख यांनी सुनावलं

(Minister Aslam Shaikh appeals to VHP came forward for organize plazma donation camp)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *