AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियुक्तीनंतर तासाभरात पदभार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये, धारावीची रणनीती ठरवणार

मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल (BCM Commissioner Iqbal singh Chahal) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

नियुक्तीनंतर तासाभरात पदभार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये, धारावीची रणनीती ठरवणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 09, 2020 | 2:58 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal singh Chahal) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. इक्बाल चहल यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी पदभार स्वीकारला. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची मुंबई मनपा आयुक्तपदी बदली झाल्याचं वृत्त आलं आणि लगेचच म्हणजे रात्री 8 च्या सुमारास इक्बाल चहल यांनी पदभारही स्वीकारला. मुंबई मनपाचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करुन, त्यांच्या जागी चहल यांना आणण्यात आलं आहे. (BMC Commissioner Iqbal singh Chahal)

मुंबई महापालिकेचे नवे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे आज सकाली पाहणीसाठी नायर रुग्णालयात पोहोचले.  नायर रुग्णालयात केवळ कोवीड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलाच पाहणी दौरा आहे.

दरम्यान, पदभार स्वीकारताच आयुक्त इक्बाल चहल हे मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी रणनीती आखत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम पाहिल्याने इक्बाल यांना धारावीचा अनुभव आहे. धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता इक्बाल चहल यांनी पहिल्यांदा धारावीकडेच लक्ष दिलं आहे. नवे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दुपारी तीन वाजता महापालिका मुख्यालयात धारावी आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

वाचा : धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

जी उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर आणि इतर अधिकारी यांना धारावीचा रिपोर्ट घेऊन महापालिका मुख्यालयात दुपारी 3 वाजता बैठकीस बोलावले आहे. स्वत: आयुक्त इक्बाल चहल हे सुद्धा धारावीला भेट देण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अद्याप वेळ निश्चित नाही.

लगेचच पदभार स्वीकारला

महानगरपालिकेचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्‍य सच‍िव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्‍य शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्‍यानुसार इक्बाल चहल यांनी काल (दिनांक 8 मे 2020) सायंकाळी महानगरपालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्‍यांच्‍याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्‍त कार्यभारही होता.

20 जानेवारी 1966 रोजी जन्‍मलेले इक्बाल चहल यांनी 12 वी परीक्षेत विज्ञान शाखेत 96 टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादित केल्यानंतर इक्बाल चहल यांनी 1989 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

भारतीय प्रशासकीय सेवेचा 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इक्बाल चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्‍यांच्‍या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्‍ये सोपवली होती.

गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या श्री. चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्‍ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

संबंधित बातम्या

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?