मुंबईत कोरोनाच्या आकड्यात घट, सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम

विशेष म्हणजे मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:36 AM, 3 Nov 2020

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेशोत्सव काळात दररोज कोरोनाचे 2 हजारहून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र आता त्यात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

मुंबईत गेल्या महिनाभरापासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा आटोक्यात येताना दिसत आहे. तसेच या मोहिमेचा मुंबईतील झोपडपट्ट्या, सोसायटीमध्येही सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

राज्य सरकारच्या मोहिमेनंतर मुंबईतील परिणाम

1. मुंबईतील सक्रिय रुग्णात 29 टक्क्याने घट झाली.
2. सीलबंद इमारतीची संख्या 30 टक्के तर कंटेन्मेंट झोन 13 टक्के घट झाली आहे.
3. कोरोना संसर्गाचे प्रमाण 1.06 टक्क्यांवरुन 0.41 टकक्यांपर्यंत खाली आले आहे.
4. कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर हा 66 दिवसांवरून 171 दिवसांवर गेला आहे.
5. ऑक्टोबर महिन्याचा मृत्यू दर 2 टक्के इतका आहे. तर एकत्र मृत्यूचा दर 4.4 टक्क्यावरून 9.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
6. रिक्त कोविड बेडची उपलब्धता 4 हजार 986 बेडवरुन 7 हजार 817 बेडवर गेली आहे.
7. रिक्त आयसीयू बेडची उपलब्धता आता 225 बेडवरून 561 बेडवर गेली आहे.
8. ऑगस्टमध्ये सुमारे 6500 सरासरी दैनंदिन चाचणी, सरासरी दैनंदिन चाचणी सुमारे 14000-16000 (बहुधा केवळ आरटी-पीसीआर) झाली आहे.
9. तर एकूण रुग्ण डिस्चार्ज रेट 82 वरून 89 वर गेली आहे.
10. रुग्णालयांमधील गंभीर रूग्णांची संख्या 2 टक्क्यांनी घटली आहे.
11. मुंबईत रविवारी 897 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र सोमवारी फक्त 693 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार

कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी