AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं

गेल्या पंधरा दिवसांत 850 लोकांना पकडून महापालिकेने त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल केला आहे.

मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं
| Updated on: Oct 02, 2020 | 11:22 PM
Share

मुंबई : मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण घटलं आहे . गेल्या पंधरा दिवसांत 850 लोकांना पकडून महापालिकेने त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास महापालिका 200 रुपये दंड वसूल करते (Number Of People Spitting On The Streets And In Public Places Decreased).

महापालिकेने मागील 17 सप्टेंबरपासून रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधातील कारवाई कडक केली आहे. कोव्हिड काळात ही कारवाई कडक करण्यात आली आहे. क्लिनअप मार्शल आणि उपद्रव शोधक पथकाद्वारे ही कारवाई करण्यात येते. 17 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या दिवशीच्या कारवाईत 134 लोकांना थुंकताना पकडण्यात आले. यासर्वांकडून 26 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला.

त्यानंतर 18 ते 21 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 75 लोकांना थुंकताना पकडण्यात आले होते. परंतु 22 सप्टेंबरपासून हे प्रमाण कमी होऊन सरासरी 35 ते 40 एवढे झाले आहे. तर सोमवारी, 1 ऑक्टोबरला 55 लोकांना थुंकताना हटकत महापालिकेने त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

त्यामुळे आतापर्यंत 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 852 लोकांना रस्त्यांवर थुंकताना पकडून, त्या सर्वांकडून महापालिकेने 1 लाख 46 हजार एवढा दंड वसूल केला आहे.

Number Of People Spitting On The Streets And In Public Places Decreased

संबंधित बातम्या :

मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन

आतापर्यंत 19 जणांना covishield लसीचा डोस, मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी सुरु

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.