मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रेल्वे टेंडरच्या नावे गंडा घालणाऱ्या गँगचा पर्दाफाश

रेल्वेत टेंडर मिळाल्यास अमाप पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल या आशेखाली या आरोपींना अनेकांनी पैसे दिल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रेल्वे टेंडरच्या नावे गंडा घालणाऱ्या गँगचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 8:31 PM

मुंबई : भारतीय रेल्वेचं टेंडर मिळवून देतो असं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या एका गँगचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. रेल्वेत टेंडर मिळाल्यास अमाप पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल या आशेखाली या आरोपींना अनेकांनी पैसे दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. (Mumbai Police Crime Branch arrested Three robbers)

गुन्हे शाखेच्या कक्षा 11 ने ही मोठी कारवाई केलेली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचे समोर आलेल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणांमध्ये एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

रेल्वे खात्यामध्ये एक अधिकारी ओळखीचा आहे आणि तो मोठ्या पदावर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करतो. त्यामुळं हॉर्स पाईप जोडण्यासाठी लागणार सगळं टेंडर त्याच्या हातातून काढलं जात अशी बतावणी करून हे तीन आरोपी अनेकांना आपले सावज बनवत होते.

मात्र, ही टेंडर मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन सुद्धा त्यांना वेळेत टेंडर न मिळाल्याने तक्रारदारांनी गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार गुन्हे शाखेने या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

या सगळ्या प्रकरणात आरोपींनी भारतीय रेल्वेशी निगडित असणारी खोटी कागदपत्रं त्याचबरोबर सही, शिक्के वापरले असल्याचा धक्कादायक खुलासा गुन्हे शाखेच्या तपासात समोर आला आहे. यानुसार गुन्हे शाखेने मयूर विनोद सोळंकी (34), किरण पुरुषोत्तम चव्हाण (42) आणि सुभाष रमण सोळंकी (35) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे.

इतर बातम्या –

मुंबईकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला
सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा

(Mumbai Police Crime Branch arrested Three robbers)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.