जयदत्त क्षीरसागर यांनी ‘राष्ट्रवादी’ सोडण्याचं कारण सांगितलं!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून, त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर […]

जयदत्त क्षीरसागर यांनी 'राष्ट्रवादी' सोडण्याचं कारण सांगितलं!
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 2:18 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून, त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामाही सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकण्यामागचे कारणही सांगितले.

“राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याला अनेक कारणे आहेत. पक्ष वाढवण्यासाठी निष्ठेने, ताकदीने मेहनत घेतली. जिल्ह्यात सहा आमदार आहेत, त्यापैकी 5 आमदार निवडून आणले. गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी, घुसमट, अवमूल्यन होणं हे सातत्याने घडत गेले. आम्ही संयमाने वाट पाहिली की यात काही दुरुस्ती होईल, सुधारणा होईल. पण दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी कार्यकर्त्यांचा संयम किती काळापर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता भुमीका स्पष्ट करा आणि हि भूमिका मला घ्यावी लागली.”, असे कारण जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे असल्याचे सांगितले.

“मी शरद पवार यांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला. अशी स्थिती अनेक जिल्ह्यात घडते आहे, दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती पण तशा गोष्टी काही घडल्या नाहीत. मला भलं बरं कोणाला बोलायचे नाही. कलगीतुरा करायचा नाही. ज्या व्यापक गोष्टी आहेत त्या विशद केल्या.”, असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

तसेच, “आताच नाही तर लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार सत्तेत यावे, नुसतं राष्ट्रवादी नव्हे तर राष्ट्रवाद जो पक्ष हातात घेऊन चालतो त्यांच्यासोबत राहावे ही जाहीर भूमिका घेतली होती.” असेही क्षीरसागर म्हणाले.

वाचा : निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, “कुणा व्यक्तीच्या येण्या किंवा जाण्याने माझ्यावर काही फरक पडणार नव्हता. 2014 ला मोदी लाटेत बीडमध्ये मी एकटा निवडून आलो. त्यामुळे कुणी आले गेले कुणाला महत्व द्यायचे हा नेतृत्वाचा प्रश्न असतो. शेवटी जुन्या-नव्याचा बॅलन्स करणे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे, सर्वांना त्यांच्या मगदुलाप्रमाणे स्थान देणं हे पक्षाचे काम असते.”

जातविरहित राजकारण हा शिवसेना गाभा आहे. कामाला-गुणाला प्राधान्य, दिलेला शब्द पाळणे हे मी पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे क्षीरसागर म्हणाले. तसेच, मी कुठल्या अटींवर प्रवेश केलेला नाही. कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याना नेहमीच भेटतो. विकासकामांमध्ये मुख्यमंत्र्यानी आम्हला साथ दिली आहे, असे क्षीरसागर म्हणाले.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

क्षीरसागर कुटुंबात वाद

काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.