पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन

पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी धडक देत आंदोलन (PMC Bank depositors protest outside Matoshree) केले.

पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन

मुंबई : रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले  (PMC Bank depositors protest outside Matoshree) आहेत. यामुळे खातेदारांना पैसे काढण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी धडक देत आंदोलन (PMC Bank depositors protest outside Matoshree) केले. यावेळी मातोश्रीबाहेर हजारो खातेदार जमा झाले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.

विशेष म्हणजे यावेळी खातेदारांनी आरबीआयची तिरडी आणली होती. दरम्यान अचानक मातोश्रीवर आलेल्या पीएमसी बँकेच्या आंदोलनामुळे पोलिसांनी खातेदारांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बँकेत जमा असलेले त्यांचे पैसे लवकरात लवकर आम्हाला परत करावेत अशीही मागणी (PMC Bank depositors protest outside Matoshree) केली.

यानंतर पीएमसीच्या बँकेच्या दोन प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना धीर दिला. तसेच सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले. तसेच पुढील चर्चेसाठी 21 आणि 22 डिसेंबर अशी तारीख देण्यात आली (PMC Bank depositors protest outside Matoshree) आहे.

बँकांचे विलीनीकरण करायचं कि खातेदारांचे पैसे परत द्यायचे यावर पीएमसी घोटाळ्यावर पूर्णपणे माहिती घेऊन निर्णय घेतील. असेही खातेदारांनी सांगितले.

दरम्यान 2019 च्या सप्टेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. यात बँकेतील काही वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी यांसह अन्य काहींचा समावेश आहे.

पीएमसी बँकेवरील निर्बंध

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली आहे. हे दोघे एचडीआयएल (HDIL) कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही आरोपींच्या जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली (PMC Bank depositors protest outside Matoshree) आहे.

संबंधित बातम्या :

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, खातेदारांना महिन्याला 1 हजार रुपयेच काढता येणार

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *