सोसायटींपेक्षा झोपडपट्टीत ॲन्टीबॉडीजचं प्रमाण सर्वाधिक, ‘सीरो’ सर्वेक्षणाचा अहवाल

या अहवालानुसार इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे.

सोसायटींपेक्षा झोपडपट्टीत ॲन्टीबॉडीजचं प्रमाण सर्वाधिक, ‘सीरो’ सर्वेक्षणाचा अहवाल
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 10:14 PM

मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संदर्भात ॲन्टीबॉडीज सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीचा अहवाल आला आहे (SARS-CoV2 Antibodies Survey). दुसऱ्या फेरीचे निष्कर्ष हे बहुतांशी पहिल्या फेरीसारखेच आहेत. या अहवालानुसार इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे (SARS-CoV2 Antibodies Survey).

मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.

भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ॲन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यारस करण्यासाठी दोन फेऱ्यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. आता याच संशोधनांतर्गत दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पहिल्या फेरीमध्ये 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोव्हिड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली (SARS-CoV2 Antibodies Survey).

संबंधित सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरी अंतर्गत 5 हजार 840 एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होते.

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.

सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे 

पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये ॲन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. तर दुसऱ्या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ताींमध्ये सरासरी 27 टक्के एवढे ॲन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.

SARS-CoV2 Antibodies Survey

संबंधित बातम्या :

कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचं सावट, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.