LIVE उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा विमा कंपन्यांवर धडक मोर्चा

पीक विम्याच्या मुद्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आज म्हणजेच बुधवार 17 जुलैला विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

LIVE उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा विमा कंपन्यांवर धडक मोर्चा

मुंबई : पीक विम्याच्या मुद्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आज म्हणजेच बुधवार 17 जुलैला विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ काढण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येत आहे.

शिवसेनेचे दिग्गज नेते मोर्चात सहभागी

या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री मोर्चात सहभागी झाले.

वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसाठी शिवसेना विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर धडकणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉट येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. मुंबईतील मोर्चा हा प्रातिनिधिक मोर्चा आहे. राज्यभरातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेनेची शिष्टमंडळं जाणार आहेत.

शिवसेनेचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा

“वेगवेगळे निकष लावून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहेत. मोर्चाच्या माध्यमातून या कंपन्याना इशारा देण्यात येत आहे.  हा प्रातिनिधिक मोर्चा आहे. विमा कंपन्याना हा इशारा आहे. विमा कार्यालये मुंबईत आहेत. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. आम्ही शेतकरी नसलो, तरी शेतकऱ्यांच्या वेदना, दुःख जाणू शकतो. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे”, असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे या कंपन्याना ठरावीक मुदत देतील. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन दिसेल, असंही आमदार परब म्हणाले.

शिवसेना सरकारमध्ये आहे. पण हा मोर्चा सरकारविरोधात नाही. हा विमा कंपन्यांविरोधातला मोर्चा आहे. सरकारला जी योजना राबवायची आहे ती राबवली जातेय, तरीसुद्धा काही निकषांचा आधार घेऊन शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. अशा कंपन्यांवर शिवसेनेचा दबाव असेल. सरकारच्या कारवाईची वाट न पाहता शिवसेनेची ताकद उद्या दिसेल. या कंपन्याना शिवसेनेपुढे दबावेच लागेल, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *