AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRP घोटाळा : साक्षीदार होण्याच्या तयारीनंतर आरोपीला जामीन; तर चॅनेल मालकासह पाच जणांचे अर्ज फेटाळले

टीआरपी घोटाळ्यात 7 ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

TRP घोटाळा : साक्षीदार होण्याच्या तयारीनंतर आरोपीला जामीन; तर चॅनेल मालकासह पाच जणांचे अर्ज फेटाळले
| Updated on: Oct 26, 2020 | 5:51 PM
Share

मुंबई : देशभर गाजणाऱ्या टीआरपी घोटाळ्यात एका आरोपीने साक्षीदार होण्याची तयारी दाखवली. त्यानंतर हायकोर्टाने आरोपी उमेश मिश्रा याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तर चॅनेल मालकासह पाच जणांचे जामीन कोर्टाने फेटाळले. मुख्य आरोपी अभिषेक कोलवडे याला आज पोलीस कोठडी देण्यात आली. (TRP Scam accuse ready to become witness granted bail)

टीआरपी घोटाळा प्रकरणी 7 ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचे अटकसत्र सुरु झाले. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोणाकोणाला बेड्या?

1) विशाल वेद भंडारी 2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री 3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी 4) नारायण नंदकिशोर शर्मा 5) विनय राजेंद्र त्रिपाठी 6) उमेश मिश्रा

सुरुवातीला सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचा पोलीस रिमांड संपल्यावर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. यानंतर या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. त्यावर आज किल्ला कोर्ट येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी निकाल दिला.

कोणाकोणाचा जामीन फेटाळला?

1) विशाल वेद भंडारी 2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री 3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी 4) नारायण नंदकिशोर शर्मा 5) विनय राजेंद्र त्रिपाठी

उमेश मिश्रा याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील इतर चार आरोपींना रिमांडसाठी कोर्टात हजर करण्यात आलं. (TRP Scam accuse ready to become witness granted bail)

1) रामजी शर्मा 2) दिनेश विश्वकर्मा 3) हरिष पाटील 4) अभिषेक कोलावडे

या चौघांना रिमांडसाठी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी हरीश पाटील याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. तर रामजी वर्मा, दिनेश विश्वकर्मा आणि अभिषेक कोलावडे यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. रामजी, दिनेश आणि अभिषेक हे मुख्य आरोपी आहेत. त्यांनी बॅरोमिटरमध्ये फेरफार केली, पैसे वाटले, असा युक्तिवाद सरकारी वकील एकनाथ धमाल यांनी केला. यानंतर कोर्टाने तिघांना पोलीस कोठडीत पाठवलं.

टीआरपी प्रकरणात आता महत्वाचे धागेदोरे उलगडले जात आहेत. उमेश मिश्रा याने आता साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे त्याला जामीन मिळाला. हंसा रिसर्च कंपनीच्या बॅरोमिटरमध्ये फेरफार कशा प्रकारे होते, त्यात कोणकोण सहभागी आहे, ‘बार्क’चा यात काही आहे का? अशा अनेक मुद्यांचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

गुन्हा रद्द करता येणार नाही, सीबीआयकडे प्रकरण वर्ग होणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका

TRP Scam | रिप्लबिक चॅनलच्या याचिकेवर सुनावणी, हरीश साळवे आणि कपिल सिब्बल आमने-सामने

(TRP Scam accuse ready to become witness granted bail)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.