AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानवर भारताची दुसरी मोठी कारवाई, 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले

India Pakistan Tensions: भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. यासंदर्भात भारताने अधिकृत निवेदनही काढले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर भारताची दुसरी मोठी कारवाई, 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानवर भारताचा ड्रोन हल्ला
| Updated on: May 08, 2025 | 3:55 PM
Share

India Pakistan Tensions: भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूरचा पार्ट 2 केला आहे. भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानवर आता पाकिस्तानमधील शहरांवर ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होतो. तो प्रयत्न भारताला हाणून पडला. यासंदर्भात भारत सरकारने अधिकृत पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे  म्हटले आहे.

पाकिस्तानकडून भारताच्या नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार सुरु केला आहे. तसेच भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. भारताच्या एस ४०० हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्र नष्ट केली. त्याचे अवशेष सीमा भागात दिसून येत आहे. भारताने पहिल्यांदाच एस ४०० या हवाई प्रणालीचा वापर भारताने केला आहे. रशियाने विकसित केलेली ही प्रणाली आहे. भारताने रशियाकडून ती घेतली आहे.

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली. ड्रोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या HQ-9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. लाहोर व्यतिरिक्त, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथेही असे ड्रोन हल्ले झाले आहेत.

भारताने काय म्हटले?

भारत सरकारने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पीआयबीकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारतानेही पाकिस्तानला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे.”

पीआयबीने म्हटले आहे की, 8 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये तोफगोळे टाकण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. त्यामुळे भारताचे 12 नागरिक आणि एक सैनिक शहीद झाला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.