AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: श्रीनगरमध्ये अतिरेक्यांचा एके-47सह मुक्तसंचार, पोलीस ताफ्यावर हल्ला; दोन पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकंवर काढलं आहे. (2 Policemen dead In Terrorist Attack On Police Party In Srinagar)

Video: श्रीनगरमध्ये अतिरेक्यांचा एके-47सह मुक्तसंचार, पोलीस ताफ्यावर हल्ला; दोन पोलीस शहीद
| Updated on: Feb 19, 2021 | 4:56 PM
Share

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकंवर काढलं आहे. श्रीनगरच्या बाराजुल्ला परिसरातील बाजारात एके-47 सह मुक्तपणे संचार करणाऱ्य अतिरिक्यांनी पोलीस पार्टीवर हल्ला केला. अचानक बेछुटपणे सुरू केलेल्या या गोळीबारात बेसावध असलेले दोन पोलीस शहीद झाले. हे दोन्ही पोलीस जम्मू-काश्मीर पोलीस दलातील आहे. या चकमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. (2 Policemen dead In Terrorist Attack On Police Party In Srinagar)

कॉन्स्टेबल सुहैल अहमद आणि मोहम्मद युसूफ असं या दोन पोलीस शिपायांचं नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक अतिरेकी मार्केटमध्ये घुसला आणि एका दुकानाच्या बाहेर उभं राहून त्याने दोन पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर हा अतिरेकी फरार झाला. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीआरएफ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू

या पोलीस पार्टीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. त्यात एका अतिरेक्याच्या हातात एके-47 असून हा अतिरेकी मार्केटमध्ये फिरत असल्याचं दिसत आहे. सुरक्षा दलाने या सीसीटीव्ही फुटेजवरून अतिरेक्याची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते दोन अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. फायरिंग केल्यानंतर हे दोन्ही अतिरेकी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले.

सर्च ऑपरेशन सुरू

या हल्ल्याची माहिती मिळता जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या परिसरात त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. शहीद झालेले पोलीस हे श्रीनगर एअरपोर्ट ते श्रीनगर शहर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर तैनात होते. बाजूलाच बगात बाराजुल्ला पोलीस चौकीही आहे. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार हे अतिरेकी कोणत्या तरी गल्लीतून आले आणि फायरिंग करून फरार झाले. (2 Policemen dead In Terrorist Attack On Police Party In Srinagar)

लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शोपियांमध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. यावेळी सुरक्षा दलाने अतिरेक्यांकडी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा जप्त केला. या चकमकीनंतर आता संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. शोपियांमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून संयुक्त कारवाई केली. शोपियांमध्ये चकमक सुरू असतानाच बडगाममध्येही सुरक्षा दल, पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये जोरदरा चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. (2 Policemen dead In Terrorist Attack On Police Party In Srinagar)

संबंधित बातम्या:

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा; एक एसपीओ शहीद

गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

(2 Policemen dead In Terrorist Attack On Police Party In Srinagar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.