RBI Gold Stock : गुपचूप पाठवले 200 टन विदेशात तर 268 टन सोने ठेवले गहाण! पण खरं काय?

RBI Gold Stock : RTI अंतर्गत मागितलेल्या माहितीत, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुपचूप 200 टन सोने परदेशात पाठविल्याचे समोर आले. तसेच आरबीआयने 268 टन सोने गहाण ठेवल्याचा दावा याविषयीच्या वृत्तात करण्यात आला.

RBI Gold Stock : गुपचूप पाठवले 200 टन विदेशात तर 268 टन सोने ठेवले गहाण! पण खरं काय?
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 6:47 PM

नवी दिल्ली : समाज माध्यमात विविध प्लॅटफॉर्म्सवर एक बातमी व्हायरल होत आहे. त्यात एकाहून एक खळबळजनक दावे करण्यात आले आहे. त्यानुसार, नवनीत चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीने माहिती अधिकारात (RTI) सोन्याच्या साठ्याबाबत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देण्यात आले. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुपचूप 200 टन सोने परदेशात पाठविल्याचे समोर आले. तसेच आरबीआयने 268 टन सोने गहाण ठेवल्याचा (Pledge of Gold) दावा याविषयीच्या वृत्तात करण्यात आला. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या वृत्तात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही बाब जनतेपासून लपवून ठेवण्याचा दावा करण्यात आला. त्यावरुन देशात एकच खळबळ माजली. या वृत्तावरुन उलटसूलट चर्चा रंगली.

पत्र सूचना कार्यालयाने (PIB Fact Check) या दाव्याचा पडताळा केला. या व्हायरल वृत्ताची पडताळणी करण्यात आली. या बातमीने देशभरात एकच खळबळ माजवली. त्यामुळे या वृत्ताची केंद्र सरकारने गंभीरतेने दखल घेतली. याविषयीवर अखेर केंद्र सरकारने खुलासा केला. पीआयबी फॅक्ट चेकच्या माध्यमातून या दाव्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पीआयबीने या संपूर्ण दाव्याचा खरेखोटेपणा उघड केला.

हे सुद्धा वाचा

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुपचूप 200 टन सोने परदेशात पाठविल्याचे समोर आले. तसेच आरबीआयने 268 टन सोने गहाण ठेवल्याचा दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा असल्याचे उघड झाले. PIB Fact Check ने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यात ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात PIB Fact Check ने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका प्रेस रिलिजची लिंकही शेअर केली आहे. मे 2019 रोजी केंद्रीय बँकेने ही प्रेस रिलीज काढली आहे. त्यानुसार, जगभरातील केंद्रीय बँका सोन्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी परदेशात ठेवतात. 2014 नंतर भारतीय केंद्रीय बँकेने सोने, सोन्याचा साठा दुसऱ्या देशात सुरक्षेसाठी ठेवला नसल्याचे या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

जगभरात सोन्याचा एकूण साठ्यावर एक नजर टाकल्यास, सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे. जगभरातील एकूण सोन्यापैकी जवळपास 75 टक्के साठा अमेरिकेकडे आहे. एका आकड्यानुसार, अमेरिकाकडे जवळपास 8,133 टन सोने आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी जर्मनी आहे. जर्मनीकडे 3,359 टन सोने आहे. चीन या यादीत सहाव्या स्थानी आहे. चीनकडे 1,948 टन सोने आहे. सोन्याचे भंडार असलेल्या टॉप-10 देशात आशियातील केवळ तीन देश आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.