Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Mines : बाबुभाई, खजिना गवासला की! भारतात मिळाल्या सोन्याच्या खाणी

Gold Mines : जम्मू-कश्मिरमध्ये लिथियमचे साठ सापडले. त्यानंतर आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील या राज्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. भारत सोन्याच्या आयात करणाऱ्या प्रमुख आयातदार देशांपैकी एक आहे. या खाणीमुळे देशाला मोठा फायदा होईल.

Gold Mines : बाबुभाई, खजिना गवासला की! भारतात मिळाल्या सोन्याच्या खाणी
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:08 PM

नवी दिल्ली : जम्मू-कश्मिरमध्ये लिथियमचे साठ सापडले. त्यानंतर आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील या राज्यात सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्या आहेत. भारत सोन्याच्या आयात करणाऱ्या प्रमुख आयातदार देशांपैकी एक आहे. गेल्यावर्षी जानेवारी, 2022 मध्ये देशात 45 टन सोन्याची आयात करण्यात आली होती. गेल्यावर्षी देशात 69.7 कोटी डॉलर सोने आयात करण्यात आले होते. यंदा आकड्यांनी खरी परिस्थिती समोर आणली आहे. यंदा केवळ 2.38 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने (GSI) सोन्याच्या खाणी शोधून काढल्या आहेत. या खाणीमुळे देशाला मोठा फायदा होईल.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने ओडिशा राज्यातील तीन जिल्ह्यात हे सोन्याचे भांडार (Gold Mines found in Odisha) समोर आणले आहे. राज्याचे पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल मल्लिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यातील देवगड, केओंझर आणि मयूरभंजमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. यामुळे भारताच्या आयात धोरणाचा लवकरच पूनर्विचार करण्यात येऊ शकतो. इतर देशांवरील सोन्यासाठीचे अवलंबित्व कमी होऊ शकते.

ढेंकानालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी याविषयीचा लिखीत प्रश्न विचारला होता. त्याला प्रफुल्ल मल्लिक यांनी उत्तर दिले. त्यानुसार, खाण संचालनालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या सर्वेक्षणात तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भांडार सापडले आहे. यामध्ये देवगड, केओंझार आणि मयूरभंजचा समावेश आहे. या जिल्ह्यातील विविध भागात हा खजिना गवसला आहे.

हे सुद्धा वाचा

केओंझरमध्ये चार विविध ठिकाणी, मयूरभंजमध्ये चार ठिकाणी आणि देवगडमध्ये एका ठिकाणी सोन्याचा साठा सापडला आहे. दिमिरमुंडा, कुशाकला, गोटीपूर, गोपूर, जोशीपूर, सुरियागुडा, रुआनसिला, धुशुरा टेकडी आणि अडास या परिसरात हा सोन्याचा खजिना गवसला आहे. या भागात पहिले सर्वेक्षण 1970 आणि 1980 च्या दशकात करण्यात आले होते. परंतु सर्वेक्षणाचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले नाही. जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रांचे पुन्हा एकदा नव्याने सर्वेक्षण केले आणि त्यात हा खजिना उघड झाला.

सध्या भारतात सोन्याच्या तीन ठिकाणी खाणी आहेत. यापैकी कर्नाटकातील हुट्टी आणि उटी येथे सोन्याच्या खाणी आहेत. तर झारखंडमध्ये हिराबुद्दीन परिसरात सोन्याची खाण आहे. भारताचे सोन्याचे उत्पादन जवळपास 1.6 टन आहे. तर वार्षिक वापर 774 टन इतका आहे. उत्पादनाच्या अनेक पट्टीत आयात होते आणि वापर होतो.

देशात सोन्याची मागणी सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकार देशातच सोन्याचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहे. त्यासाठी गेल्यावर्षी निती आयोगाने पावले टाकली आहेत. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. खनिज मंत्रालयाने याविषयीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारताचे एकूण सोने भांडार 70.1 टन (4.1 जी/टन वर 17.2 एमटी) आहे. देशात सर्वाधिक सोने दक्षिण भारतात आहे. कर्नाटक राज्यातच 88 टक्के सोने साठा आहे.

हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.