AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो येतो तो गायब होतो… बागेश्वर धाममध्ये असं काय घडतं?; 4 महिन्यात 21 जण बेपत्ता

Bageshwar Dham : मंगळवार व शनिवारी बागेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांची जास्त गर्दी असते. पण आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे काहीतरी मागण्याची इच्छा घेऊन आलेले अनेकजण आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्ती धाममध्ये गमावत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 21 जण धाममधून बेपत्ता झाले आहेत.

जो येतो तो गायब होतो... बागेश्वर धाममध्ये असं काय घडतं?; 4 महिन्यात 21 जण बेपत्ता
Image Credit source: social media
| Updated on: May 10, 2023 | 3:18 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामची (Bageshwar Dham) देशभर चर्चा आहे. देश आणि जगातील लोक अर्ज करण्यासाठी दररोज बागेश्वर धाम गाठत आहेत. आठवड्यातील मंगळवार आणि शनिवारी येथे भाविकांची अधिक गर्दी होते. या दोन दिवसांत भाविकांची संख्या लाखांवर पोहोचते. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भगवंताकडे काही मागावे या इच्छेने आलेले अनेक लोक आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना धाममध्ये गमावत आहेत. म्हणजेच बागेश्वर धाममधून आजवर अनेक जण बेपत्ता झाले (people are missing) असून त्यांचा शोधही पोलिसांना (police) लावता आलेला नाही.

बागेश्वर धाम येथून बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण मानसिक आजारी आहेत. तर काही जण गर्दीमुळे कुटुंबापासून विभक्त झालेले आहेत. त्यापैकी कोणाचाही पत्ता लागला नाही. आपल्या विभक्त झालेल्या आणि हरवलेल्या लोकांच्या शोधात देशाच्या इतर राज्यात राहणारे अनेक लोक धामच्या पोलीस स्टेशन आणि कार्यालयांच्या चकरा मारत आहेत.

पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2023 पासून बागेश्वर धाम येथून 21 जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी 9 जणांचा शोध लागला असला तरी 12 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

अद्याप 12 जणांचा शोध सुरू आहे

छतरपूर जिल्ह्याचे पोलिस कॅप्टन अमित सांघी म्हणतात की बेपत्ता झालेल्या इतर 12 लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिस सतत प्रयत्न करत आहेत. कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पोलीस बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

कुठे आहे बागेश्वर धाम ?

बागेश्वर धाम मंदिर मध्य प्रदेश राज्यातील छत्तरपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील गंज शहरापासून 35 किमी अंतरावर गढा गाव वसलेले असून त्याच गावात हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर परिसर बागेश्वर धाम आणि हनुमान जी बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध आहे.

बागेश्वर धाम सरकारचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहेत, जे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. शास्त्री देशभरातील धार्मिक कथा सांगतात. त्याच वेळी, हा कथाकार त्याच्या प्रसिद्ध विधानांमुळे आणि कथांदरम्यान होणारा दैवी दरबार यामुळे सतत चर्चेत असतो.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा