राजस्थानमध्ये 250 दलित हिंदू कुटुंबांनी केले बौद्ध धर्मात धर्मांतरण, इतका मोठा निर्णय त्यांनी का घेतला?

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण अजूनही दलित आणि सवर्णांचे ग्रहण भारताच्या ग्रामीण भागात सुटलेले नाही. राजस्थानमध्ये सवर्णांच्या जाचाला कंटाळून 250 दलित हिंदूंनी बोद्ध धर्म स्वीकारला आहे.

राजस्थानमध्ये 250 दलित हिंदू कुटुंबांनी केले बौद्ध धर्मात धर्मांतरण, इतका मोठा निर्णय त्यांनी का घेतला?
हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 5:52 PM

बारां (राजस्थान), बारां जिल्ह्यात, सवर्ण समाजातील लोकांच्या मारहाणीमुळे दुखावलेल्या 250 लोकांच्या दलित कुटुंबांनी शुक्रवारी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला (Hindu Families Convert In Buddhism). यासोबतच घरातील देवदेवतांच्या मूर्ती व फोटोंचे बेथली नदीत विसर्जन करण्यात आले. हे प्रकरण जिल्ह्यातील भुलोन गावातील आहे. येथेही राज्य सरकारच्या विरोधात दलितांच्या संतापाचा उद्रेक झाला. जिल्हा बैरवा महासभा युवा मोर्चाचे अध्यक्ष बालमुकंद बैरवा यांनी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी भुलोन  गावात राजेंद्र व रामहेत ऐरवाल यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच प्रतिनिधी राहुल शर्मा आणि लालचंद लोढा यांनी दोन्ही दलित तरुणांना बेदम मारहाण केली. दलित समाजाने राष्ट्रपतींपासून जिल्हा प्रशासनाकडे सर्वांनाच  न्यायाची याचना केली, मात्र पोलिसांनी सरपंच प्रतिनिधीवर कोणतीही कारवाई केली नाही.

इतका मोठा निर्णय का घेतला?

अखेर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पीडित कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी शुक्रवारी गावाच्या मुख्य रस्त्यावरून संताप रॅली काढली. यासोबतच बेथली नदीवर आल्यानंतर देवी- देवतांच्या मूर्ती  नदीत विसर्जित करण्यात आल्या. यानंतर डॉ.भीमराव आंबेडकर यांची 22 प्रतिज्ञा घेत हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याची शपथ घेतली.

बालमुकंद बैरवा यांनी सांगितले की, दलित कुटुंबाला सतत जीवे मारण्याच्या आणि गावाबाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आरोपींना लवकर अटक न केल्यास उपविभाग कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणी डीएसपी पूजा नगर यांनी सांगितले की, तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सरपंच प्रतिनिधीचे नाव लिहिलेले नाही. त्यावर राजकारण केले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात .

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.