AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?

26/11 मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएने त्याच्या 20 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने राणाला 18 दिवसांची कोठडी दिली. राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पित करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tahawwur Rana : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?
Tahawwur RanaImage Credit source: tv9 marathi
Updated on: Apr 11, 2025 | 2:14 AM
Share

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला अखेर आज रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासानंतर कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली आहे.

तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आलं. यावेळी एनआयएच्या वकिलाने राणाला 20 दिवसाची कोठडी देण्याची मागणी केली. सुनावणीच्यावेळी एनआयएच्या वकिलांनी खटल्याशी संबंधित काही तथ्य समोर ठेवले. सुनावणी बंद खोलीत झाली. कोर्टात तहव्वूर राणा, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने दिलेला त्याचा वकील आणि एनआयएच्या लीगल टीमसह जज आणइ कोर्टाचा स्टाफ उपस्थित होता. एनआयएकडून ज्येष्ठ वकील कृष्णन यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

कोर्टात सुनावणी सुरू असताना सुरक्षा रक्षकांचा कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी कोर्टाबाहेर रूट मार्च काढला. या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. कोणत्याही वाहनाला कोर्ट परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच कोणत्याही व्यक्तीला आत सोडण्यात येत नव्हते.

कार्यालय सॅनिटाईज

विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर अडीच तासानंतर राणाला कोर्टात आणण्यात आलं. विमानतळावरच त्याची मेडिकल चेकअप करण्यात आली होती. कोर्टातून राणाला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे एनआयएचं मुख्यालय सॅनिटाईज करण्यात आलं आहे. एनआयएच्या कार्यालयाबाहेर डॉग स्क्वॉडची टीम तैनात करण्यात आली आहे. मुख्यालयाबाहेरच्या प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्यात येत आहे.

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पण प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाचे प्रवक्ते निकोल नवास ऑक्समन यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. प्रत्यार्पण 26/11 च्या पीडितांना न्याय देण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे. अमेरिकेने दोषी दहशतवादी तहव्वूर राणाला भारतातील हल्ल्याप्रकरणी प्रत्यार्पित करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित 10 गुन्हे भारताने दाखवले होते. दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. राणाचं प्रत्यार्पण म्हणजे त्या अमेरिकन नागरिकांना न्याय देण्यासाठी उचलण्यात आल्याचं हे पाऊल आहे, असं निकोल नवास ऑक्समन म्हणाल्या.

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या
मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या.
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला.
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर.
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...