दहशतवादी अजमल कसाब विरोधात साक्ष देताना ती नाही डगमगली, पण संघर्ष काही तिची पाठ सोडेना

26/11 Mumbai Attack | 26/11 मुंबई हल्ल्याने देशालाच नाही तर जगाला हादरवले होते. पाकिस्तानच्या दहशतवादांनी मुंबईत निष्पापांचे बळी घेतले. या हल्ल्यातील एक साक्षीदार देविका रोतावन हिने दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात साक्ष दिली. त्यावेळी ती 9 वर्षांची होती. तिची संघर्षगाथा अजून संपलेली नाही. काय आहे देविकाचे स्वप्न...

दहशतवादी अजमल कसाब विरोधात साक्ष देताना ती नाही डगमगली, पण संघर्ष काही तिची पाठ सोडेना
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 11:08 AM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : वर्ष 2008. नोव्हेंबर महिन्यातील 26 तारीख. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन. पाकिस्तानातून समुद्र मार्गे दहशतवादी दाखल झाले. त्यांनी या स्टेशनवर निष्पापांचे बळी घेतले. त्यांनी स्टेशनवर अंधाधूंद गोळीबार केला. त्यात जवळपास 50 नागरिकांना जीव गमवावा लागला. यामध्ये 100 जण जखमी झाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात तपास सत्र, छापेमारी करत या दहशतवाद्यांना टिपण्यात आले. ताज हॉटेलमध्ये त्यांना यमसदनी पाठविण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे यांनी कसाब याला जीवंत पकडले. या हल्ल्यातील अनेकांनी मृत्यू जवळून पाहिला. अनेकांच्या मनपटलावर त्याच्या खोल जखमा झाल्या.

अजमल कसाबविरोधात साक्ष

दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात मुंबई न्यायालयात सुनावणी झाली. त्याच्याविरोधात 9 वर्षांच्या मुलीने साक्ष दिली. त्यावेळी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. देविका रोतावन असे तिचे नाव आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी ती स्टेशनवर होती. तिच्या पायाला गोळी लागली होती. तिने या सर्व दहशतवाद्यांना पाहिले होते.

हे सुद्धा वाचा

संघर्ष अजून संपलेला नाही

न्यायालयात देविका ही सर्वात कमी वयाची साक्षीदार होती. तिने कसाबला ओळखले होते. मीडियात तिचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. कुबड्या घेऊन ती न्यायालयात अनेकदा आली. सुनावणीला हजर झाली. देशाच्या शत्रूविरोधात तिने हिम्मतीने साक्ष दिली. पण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, देविका आता लाजाळू राहिलेली नाही. ती आता थेट उत्तर देते. ती आता 24 वर्षांची आहे. तिच्या कुटुंबियांना सरकारने आठ वर्षांत 13 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. पण या कुटुंबाची आर्थिकस्थिती चांगली नाही. ती नोकरीच्या शोधात आहे. तिच्या वडिलांच्या हाताला काम नाही.

आयपीएस व्हायचे स्वप्न

देविका पूर्वी चाळीत राहत होती. पुनर्विकासातंर्गत तिला एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट मिळाला. पण त्यासाठी तीला 19 हजार रुपये भाडे भरावे लागते. देविका पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहे. पण तीला प्रत्येकवेळी अपयश हाती येत आहे. आयपीएस अधिकारी होऊन दहशतवाद संपविण्याचे तिचे स्वप्न आहे. ते स्वप्न तीने जीवंत ठेवत संघर्ष सुरु ठेवला आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.