
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलनं होत आहेत. या सर्व एकत्रित होत असलेल्या आंदोलनांनी लक्ष वेधले आहे. तर अनेक आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बालविवाह न करण्याची उपस्थित सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली. पोलीस दलासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दलाकडून पथसंचलन करत यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली तर मंत्री गुलाबराव यांना सलामी देण्यात आली.
नाशिक याठिकणी प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ उडाला. माधवी जाधव या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ उडाला. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही? महिला कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. महिला कर्मचाऱ्यांकडून जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण पार पडल्यानंतर विविध प्रशासकीय विभागातील आणि विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर संचलन करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या आजी-माजी सैनिक आणि नागरिकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागराजन आणि प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थि होते.
जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं. आमदार अर्जुन खोतकर,नारायण कुचे,बबनराव लोणीकर,जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी बुलढाणा येथ युवक ३०० फूट मोबाईल टॉवर वर चढला. वैभव करे असे त्याचे नाव असून तो मांडवा तालुका मेहकर येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आहे .
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या चरणी मी नतमस्तक होतो. बाबासाहेबांनी जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ आज अलिबाग येथील पोलीस मुख्यालय मैदानावर संपन्न झाला.
रोहयो, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर प्रथमच मंत्री भरत गोगावले यांना हा मान देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर – 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजवंदन. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी चंद्रकांत खैरे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती असेल.
मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात आज मौसा लातूरचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे होणार भाजपात पक्ष प्रवेश. मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिथितीत होणार पक्ष प्रवेश.
प्रजासत्ताक दिन असल्याने दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मल्टी-लेयर सिक्योरिटी तैनात आहे. यात 30,000 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात आहेत.
मंत्री गिरीश महाजन आज नाशिकला करणार ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आणि पोलीस संचलन कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन राहणार उपस्थित. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण नंतर आता ध्वजवंदन. नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री असताना कुंभ मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजवंदन.
एबी फॉर्म वाटपावरून धाराशिवमध्ये शिवसेनेत निर्माण झालेल्या अंतर्गत गोंधळावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अखेर पडदा. शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मागितली माफी. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला देण्यात आल्या आहेत, त्या जागा पुन्हा शिवसेनेकडे घेतल्या जातील असं ठाम आश्वासन प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेला संभ्रम, अंतर्गत नाराजी आणि पक्षातील गोंधळ यावर आम्ही पर्याय काढू असेही पालकमंत्री प्रथम सरनाईक म्हणाले.
काँग्रेसने शेतकऱ्यावर अत्याचार केले. शेतकऱ्यांच्या मुलाला बारा तास शेतात राबवून शेतकऱ्यांवर खरे अत्याचार या काँग्रेस पक्षाने गेली साठ वर्ष केले. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका. अन्यथा शेतकऱ्यांचा प्रत्येक मुलगा आज अधिकारी म्हणून शासकीय कार्यालयात बसला असता.
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडआधी कर्तव्य पथावर तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या संख्येने लोक कर्तव्य पथावर पोहोचत आहेत. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तपासणीशिवाय कोणालाही प्रेक्षक रांगेत बसू दिलं जाणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या आन-बान आणि शानचा प्रतीक आहे. हे राष्ट्रीय महापर्व तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवी उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो, हीच कामना.
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई। भारत की आन-बान और शान का प्रतीक यह राष्ट्रीय महापर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। विकसित भारत का संकल्प और अधिक सुदृढ़ हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2026
आज प्रजासत्ताक दिन असून कर्तव्य पथावर परेड होणार आहे. त्यासाठी संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 जवान ड्युटीवर तैनात आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन प्रमुख पाहुणे आहेत. हे वर्ष यासाठी सुद्धा खास आहे की, यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कर्तव्य पथाला भव्यतेने सजवण्यात आलं आहे.