गलवान संघर्षाच्या आठवणी ताज्या: सीमेवर संघर्ष सुरूच, आज लेहमध्ये महत्वपूर्ण बैठक
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश सातत्याने चर्चा करत आहेत. मात्र दोन्ही बाजूंच्या संघर्षाच्या काही चिन्हं बदलताना दिसून येत नाही. तर काही ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांकडून माघारही घेतली गेली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चिनीमधील संघर्षाला उद्या तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. हा संघर्ष गलवानमध्ये उफाळून आला होता. 15 जून 2020 रोजी दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला होता. या चकमकीत दोन्ही देशांचे अनेक जवान शहीद झाले होते. त्यावेळेपासून दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण पसरेले असते. गेल्या तीन वर्षांत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कमांडर स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. भारत-चिनीमधील गलवान संघर्षाला तीन वर्षे उलटूनही सीमेवरील कोंडी अजूनही कायम आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंधांतील दुरावा अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अनेकवेळा याचा पुनरुच्चारही केला आहे.एलएसीवरील परिस्थिती सामान्य होईपर्यंत चीनबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकणार नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितले होते.
तर गलवान चकमकीनंतरच्या या तीन वर्षांत भारताने 3500 लांब एलएसीवर लष्करी पायाभूत सुविधा आणि लढाऊ परिस्थितीमध्ये कमालीची वाढ केली आहे.
तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश सातत्याने चर्चा करत आहेत. मात्र दोन्ही बाजूंच्या संघर्षाच्या काही चिन्हं बदलताना दिसून येत नाही. तर काही ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांकडून माघारही घेतली गेली आहे. भारताने गेल्या तीन वर्षांत एलएसीवरील चीनसोबतचे संरचनात्मक अंतर कमी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीवर संरचनात्मक विकास वेगाने होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय लष्कर सज्ज
भारतीय लष्कर एलएसीवरील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारीने सज्ज आहे. मात्र सर्व बाजूंनी या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पूर्व लडाखमधील गतिरोधामुळे तणाव वाढल्यानंतर भारतीय लष्कराने एलएसीवर अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये अनेक आधुनिक शस्त्रास्त्रांच्या खरेदीचाही समावेश करण्यात आला आहे. या चकमकीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्या लेहमध्ये महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
