पंजाब सरकारचा मोठा निर्णय; 36 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात अस्थाई स्वरुपात जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याचा  निर्णय चन्नी सरकारने घेतला आहे.

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; 36 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:29 PM

चंदीगढ – ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात अस्थाई स्वरुपात जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याचा  निर्णय चन्नी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा एक मोठा निर्णय असून, याचा फायदा पंजाबमधील जवळपास 36,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मुखमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये अस्थाई स्वरुपात काम करणाऱ्या नोकरदारांच्या नोकऱ्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पंजाब प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रेगुलराइजेशन ऑफ कॉन्ट्रॅक्चुअल एम्प्लॉइज बिल-2021 पास करण्यात आले आहे. आता हे विधेयक मान्यतेसाठी विधानसेभेत सादर केले जाणार आहे.

10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्यांना फायदा 

य निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी पत्रकारांना सांगितले की, ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध भागात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली आहे. त्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 36,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

किमान वेतनात वाढ 

या विधेयकाला मंजुरी देण्यासोबतच पंजाब सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. किमान वेतनामध्ये 415.89 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंजाबमध्ये किमान वेतन हे 8776.83 रुपये इतके आहे. आता त्यामध्ये वाढ करून ते, 9192.72 रुपये करण्यात आले आहे.

लोकप्रिय योजनांच्या घोषणेचा सपाटा 

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पंजाबमध्ये विविध लोकप्रिय योजनांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पेट्रोल, आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पेट्रोलच्या किमती 5 रुपये तर डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्यात आल्या.  त्यापूर्वीच विजेच्या दरामध्ये देखील कपात करण्यात आली होती. आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला याचा फायदा होणार असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

टेलर स्विफ्ट Twitter वर सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर तर सचिनची झाली एंट्री; बघा पुर्ण यादी

Covid Vaccine: WHO नंतर 96 देशांकडून Covaxin ला मान्यता – मनसुख मांडविया

Lakhimpur Kheri Voilence: लाखीमपूर खीरी प्रकरणात नवा खुलासा; आशिष मिश्राच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.