AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथीतल्या मुली टिकली आणि हिजाब घालून शाळेत आल्या म्हणून मारहाण! शिक्षकावर पालकांचे गंभीर आरोप

School girls beaten : विद्यार्थीनींना दुखावण्याचा प्रकार या द्वारे झाल्याचा आरोप प्रशासनाकडून लावला जाऊ शकतो, असं सांगितलं जातंय. त्यानुसार 323, 325, 352 आणि 506 नुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

चौथीतल्या मुली टिकली आणि हिजाब घालून शाळेत आल्या म्हणून मारहाण! शिक्षकावर पालकांचे गंभीर आरोप
जम्मू काश्मीरमधील धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 07, 2022 | 4:00 PM
Share

जम्मू काश्मिरमध्ये (Jammu Kashmir) दोघा विद्यार्थीनींना (girls beaten by teacher) शिक्षकानं मारहाण केली. एक मुलगी टिकली लावून शाळेत आली होती, तर दुसरी मुलगी हिजाब घालून शाळेत आलेली. हिजाब घालून आणि टिकलू लावून शाळेत आल्यानं चौथीत शिकणाऱ्या या विद्यार्थीनींना शिक्षकानं मारहाण केली. जम्मू काश्मीरच्या एका सरकारी शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी शिक्षकाला अखेर निलंबित करण्यात आलं. या मारहाण प्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या विद्यार्थीनींच्या कुटुंबीयांनी एक व्हिडीओही शेअर केलाय. या व्हिडीओद्वारे या विद्यार्थीनींसोबत नेमकं काय घडलं, याचा खुलासा कुटुंबीयांनी केलाय. एकूणच हे प्रकरण प्रचंड तापल्यानंतर शाळेतील शिक्षकावर निलबंनाची (Suspected accused teacher suspended) कारवाई करण्यात आलीय. विद्यार्थीनींना मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव निसार अहमद असं आहे. दैनिक भास्करनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

काय म्हणाले कुटुंबीय?

राजौरीतील रहिवाशांनी या घटनेबाबत व्हिडीओ जारी करत सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकलाय. शिक्षक निसार अहमद यांच्यावर मुलींना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थीनीचे वडील अंग्रेज सिंह यांनी म्हटलंय की..

आज माध्या आणि शकूर यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली. उद्या दुसऱ्या कुणाची मुलं टिकली लावून किंवा हिजाब घालून शाळेत गेल्या, तर त्यांनाही मारहाण केली जाऊ शकते. मी सरकारला आवाहन करतो, की याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आम्हाला न्याय हवाय. सामाजिक एकतेला भंग करण्याचा प्रयत्न होतो आहे. आम्ही या जागेचा यूपी, बिहार किंवा कर्नाटक नाही होऊ देणार.

नेमकी शिक्षकानं केलेली मारहाण ही विद्यार्थीनींनी टिकली लावल्यानं आणि हिजाब घातल्यानंच केली होती की आणखी काही कारण होतं, याची आता स्थानिक अधिकाऱ्यांकडून अधिक चौकशी केली जाते आहे. जम्मू काश्मीरच्या द्रामन गावातील सराकरी शाळेमध्ये हा प्रकार घडलाय.

शिक्षकावर निलंबनाव्यतिरीक्त काय कारवाई?

विद्यार्थीनींना दुखावण्याचा प्रकार या द्वारे झाल्याचा आरोप प्रशासनाकडून लावला जाऊ शकतो, असं सांगितलं जातंय. त्यानुसार 323, 325, 352 आणि 506 नुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तसंच सहा महिन्यांपर्यंत शिक्षाही होऊ शकते. दरम्यान, याप्रकरणा शिक्षक दोी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

देव देवतांवर आक्षेपार्ह लिखाणामुळे प्राध्यापकानं नोकरी गमावली; अलिगड विद्यापीठ चर्चेत

Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद

Accident CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.