AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ बस आणि टँकरचा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता, की टॅंकरमधील चालक जागीच ठार झाला, तर खाजगी बस मधील चालक आणि क्लीनर यांनाही जागीच प्राण गमवावे लागले आहेत.

Accident CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं
वाशिममध्ये बस-टँकरचा भीषण अपघातImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 12:07 PM
Share

वाशिम : अकोला-नांदेड महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टँकरच्या भीषण अपघाताची (Bus Accident) दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. वाटाणे लॉनसमोर बस आणि पाण्याच्या टँकरचा अपघात झाला होता. पुण्याहून निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस आणि पाण्याचा टँकर (Water Tanker) यांची गुरुवारी सकाळी समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर 8 जण जखमी झाले आहेत. टॅंकर चालक, खाजगी बसचा चालक आणि क्लीनर यांना अपघातात जागीच प्राण गमवावे लागले आहेत. तर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी वाशिम (Washim) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स पुण्यावरुन यवतमाळकडे जात असताना हा अपघात झाला. बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसतानाची अंगावर शहारे आणणारी दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत.

नेमकं काय घडलं?

वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ बस आणि टँकरचा अपघात झाला. पुण्यावरुन यवतमाळला जाणारी खाजगी बस आणि समृद्धी महामार्गावर जाणारा पाण्याचा टॅंकर यांचा आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची माहिकी आहे.

दोन्ही ड्रायव्हर्सचा जागीच मृत्यू

बस-टँकर अपघाताची भीषणता इतकी होती, टॅंकरमधील चालक जागीच मृत्युमुखी पडला, तर खाजगी बसचा चालक आणि क्लीनर यांनाही घटनास्थळीचे मृत्यूने गाठले. खाजगी ट्रॅव्हल्समधील 7 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर टँकरमधील एक जण जखमी असल्याची माहिती आहे.

7 ते 8 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी वाशिम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात येणार आहे.

पाहा अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर

एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद

Beed CCTV | सुसाट कारची धडक, अंबाजोगाईत तिघांचा मृत्यू, विजेचा खांबही आडवा

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.