AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय रे देवा ! 19 वर्षांची नवरी अन् 60 वर्षांचा नवरा, लग्न रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना घरातूनच हाकललं !

या इसमाने लग्नाचा खर्च करण्यासाठी त्याची सहा लाखांची एफडी ( Fixed Deposit) मोडली. हे पैसे त्याने लहान मुलीच्या लग्नासाठी जमवले होते.

काय रे देवा ! 19 वर्षांची नवरी अन् 60 वर्षांचा नवरा, लग्न रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना घरातूनच हाकललं !
| Updated on: May 24, 2023 | 4:46 PM
Share

पाटणा : बिहारची राजधानी पाटणाजवळील धनरुआ येथे एका 60 वर्षाच्या व्यक्तीने अवघ्या 19 वर्षांच्या (60 year old groom and 19 year old bride) तरुणीशी लग्न केले आहे. लग्न झाल्यानंतर म्हातारा पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा गावातील लोकं तर थक्क होऊन पहात राहिले. या विवाहाबद्दल त्या इसमाच्या मुलीने त्याला जाब विचारण्याच्या प्रयत्न केला असता, त्याने मुलीलाच घरातून हाकलून दिले. एवढेच नव्हे तर तो इसम आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करण्याची धमकीही देत ​​आहे. हे धक्कादायक प्रकरण धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ओमप्रकाश असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले होते.

ओमप्रकाश यांना तीन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलींची लग्नं झाली आहेत. तर तिसरीचा विवाह अद्याप व्हायचा आहे. ओमप्रकाश यांच्या नावावर फोरलेन रोडजवळ बरीच जमीन आहे. या जमिनीचे आमिष दाखवून त्याने 19 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिला घरी आणले.

3 मे रोजी केले लग्न

ओमप्रकाश यांची छोटी मुलगी सोनालीने वडिलांच्या या कृत्याला विरोध केल्यावर त्यांनी तिला घरातून बाहेर काढले. एवढेच नाही तर तिला मालमत्तेतून हाकलून देण्याची धमकीही दिल्याने सोनालीने तिच्या वडिलांविरोधात धनरुवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनालीने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या वडिलांनी 3 मे रोजी एका 19 वर्षीय मुलीशी लग्न केले आणि 17 दिवसांनी सोमवारी ते तिला घरी घेऊन आले. त्याने मुलीच्या कुटुंबीयांना आपली मौल्यवान जमीन देण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर 19 वर्षीय तरुणीशी लग्न केले. पत्नीसह घरी आल्यानंतर मुलीने त्यांना विरोध केला असता त्यांन मुलीला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.

पोलिस येताच वृद्ध फरार

त्यानंतर सोनालीने 112 वर फोन करून पोलिसांना बोलावले. याठिकाणी पोलिसांना माहिती देताच वृद्ध पत्नीसह फरार झाला. या वृद्धाने आपल्या लग्नाचा खर्च करण्यासाठी ६ लाख रुपयांची लाखांची एफडी ही ( Fixed Deposit) तोडल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम त्यांनी त्यांची लहान मुलगी सोनालीच्या लग्नासाठी नदवान येथील बँकेत जमा केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस आरोपी वडिलांचा शोध घेत आहेत. 60 वर्षीय व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीसोबत लग्न केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका