मोठी बातमी! 7 देश आमने-सामने, थेट हल्ल्यांना सुरुवात, युद्धामुळे जगभरात खळबळ
जगामध्ये सध्या प्रचंड अशांतता आहे. अनेक देशांमध्ये संघर्ष वाढल्याचं पहायला मिळत आहे. आता सात देश आमने-सामने आले असून, हल्ल्यांना देखील सुरुवात झाली आहे, कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे.

या वर्षी जगानं अनेक युद्ध पाहिले, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं, ज्यामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. त्यानंतर गाझा आणि इस्रायमध्ये देखील युद्ध सुरू होतं, अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडून आणला गेला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील चांगलाच संघर्ष निर्माण झाला होता. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, जगामध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आशिया खंडामधील तब्बल सात देश आमने-सामने आले आहेत, त्यामुळे तणाव वाढला असून, संपूर्ण जगाचं लक्ष या सात देशांकडे लागलं आहे. जर या देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली तर त्याचा काही प्रमाणात फटका हा भारताला देखील बसण्याची शक्यता आहे.
आशियामध्ये सध्या चार आघाड्यांवर युद्धाचं ढग दाटून आलं आहे, सात देश आमने-सामने आहेत. या देशांमधील तणाव एवढा वाढला आहे की, या देशांनी आता एकमेकांवर हल्ले देखील करायला सुरुवात केली आहे. यातील दोन देश तर भारताचे शेजारी देश आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष सध्या वाढताना दिसत आहे, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या सीमाभागात गोळीबार करण्यात आला होता. त्याला अफगाणिस्ताने देखील चोख प्रत्युत्तर दिलं, यामध्ये चार नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे.
तर दुसरीकडे चीन आणि जपान आमने-सामने आले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून दोन देशांमधील संघर्ष आता चांगलाच वाढला आहे. जपान आणि आसपासच्या प्रदेशामध्ये शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी आम्ही चीनला जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशाराचं जपानकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि तैवान यांच्यामधील संघर्ष देखील वाढत आहे, अनेकदा चीनच्या लढाऊ विमानाने तैवानच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तैवान आणि चीनमधील संघर्ष देखील चांगलाच वाढला आहे.
थायलंड आणि कंबोडिया – थायलंड आणि कंबोडियामध्ये काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या मदतीने युद्धविराम झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा हे दोन देश आमने-सामने आले आहेत. थायलंडकडून कंबोडियावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका थायलंडच्या सैनिकाचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर कंबोडियानं देखील थायलंडवर हल्ला केल आहे, दोन्ही देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे.
