मोठी बातमी! जग पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर? दोन बलाढ्य देश भिडणार, चीनचं धोकादायक पाऊल
पुन्हा एकदा आशिया खंडात दोन देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. जपानने चीनवर गंभीर आरोप करत थेट कारवाईचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे चीनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडातील दोन मोठे देश चीन आणि जपानमध्ये संघर्ष वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आता जपानकडून मोठा दावा करण्यात आला आहे, त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी आमच्या लष्करी विमानांचे फायर-कंट्रोल रडार लॉक केल्याचा आरोप जपानकडून करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे चीनने आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र त्यामुळे आता आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. याबाबत दावा करताना जपानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की, चीनी नैदलाच्या 15 लढाऊ विमानांनी जापानच्या 15 फायटर जेटचे रडार लॉक केले आहेत. ओकिनावा द्वीप परिसरात चीनने ही कारवाई केली आहे. चीनने हे उचलेलं पाऊल आमच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचं जपानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
‘उत्तर दिलं जाईल’
दरम्यान चीनकडून ओकिनाकाजवळ जपानच्या फायटर विमानांचे रडार लॉक करण्यात आले आहेत. चीनच हे पाऊल म्हणजे युद्धाला निमंत्रण मानलं जात आहे. युद्धापूर्वीचं हे सर्वात खतरनाक पाऊल मानलं जात आहे. त्यानंतर जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी ट्विटरवर पोस्ट करत चीनला इशारा दिला आहे, आम्ही देखील उत्तर देऊ असं म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री हे सध्या जपान दौऱ्यावर आहेत, जपानची राजधानी टोक्योमध्ये ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना कोइजुमी म्हणाले की, जपान आणि आसपासच्या प्रदेशात शांती आणि स्थिरता ठेवण्यासाठी आम्ही चीनला जशास तसं उत्तर देऊ.
दरम्यान दुसरीकडे चीनने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चीनचं नौदल देशाची सुरक्षा आणि कायदेशी हक्क तसेच अधिकार यांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, असं चीनने म्हटलं आहे. दरम्यान चीनकडून तैवानवर आपला अधिकार असल्याचा दावा करण्यात येतो, याविरोधात बोलणाऱ्या देशांवर देखील चीनकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आता याच मुद्द्यावरून चीन आणि जपान आमने-सामने आले आहेत.
