बेंगळुरूः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau raid) छाप्यात कर्नाटकातील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरातून बरीच मालमत्ता जप्त करण्यात आली. छाप्यादरम्यान एका अधिकाऱ्याच्या घरातून 7 किलो सोने जप्त करण्यात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कृषी विभागाचे सहसंचालक रुद्रेशप्पा टी एस यांच्या अवैध संपत्तीची माहिती मिळाली होती, त्यानंतर हा छापा टाकण्यात आला, ज्या दरम्यान या अमाप संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. छाप्यामध्ये 15 लाखांची रोकड रक्कमही जप्त करण्यात आली. रुद्रेशप्पा टीएस व्यतिरिक्त इतर अनेक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर एसीबीचे छापे बुधवारी पडले.