AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | ‘तू मला फसवलेस’ म्हणत पतीने पत्नी डोक्यात फरशी घालून केला खून

ती आता वाचणार नाही. मी तिच्या डोक्यात फरशी घातली आहे. ती मला मुलीच्या केसमध्ये फसवत होती. म्हणून मी तिला मारले आहे' असे  अनमुद्दीनने आयानला सांगितले.  त्यानंतर तुझ्या मामाला फोन कर असे सांगत अनमुद्दीन घराच्या बाहेर निघून गेला.

Pimpri Chinchwad crime | 'तू मला फसवलेस' म्हणत पतीने पत्नी डोक्यात फरशी घालून केला खून
crime News
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 2:18 PM
Share

पिंपरी – झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फारशी घालून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नी जैनबी अजमुद्दीन चाकुरेचा (वय ३५) मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आयान अनमुद्दीन चाकुरे (वय १४) याने पिंपरी पोलीसात तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत पत्नी जैनबी आणि आरोपी पती अनमुद्दीन यांच्या वाद असल्यानेते सहा महिन्यापासून विभक्त राहत होते. तर मृत पत्नी मुलगा आयन व मुलगी तमन्नासोबत राहत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पती अनमुद्दीन हा परत जैनबी यांच्या सोबत राहण्यास आला होता. घटनेच्या रात्री अनमुद्दीन, जैनबी आणि आयान यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर अनमुद्दीन आणि जैनबी दोघेजण घराजवळ असलेल्या उद्यानाबाहेरील बाकावर गप्पा मारत बसले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतररात्री सर्वजण झोपी गेले. पहाटे आयनाला जाग आली तेव्हा त्याला पलंगाच्या बाजूला रक्त दिसून आले. त्याचवेळी वडील अनमुद्दीन आईच्या जवळ उभे असलेले त्याला दिसून आले. त्यावेळी आयानने आई जैनबी यांना उठवण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला मृत्यू ‘ती आता वाचणार नाही. मी तिच्या डोक्यात फरशी घातली आहे. ती मला मुलीच्या केसमध्ये फसवत होती. म्हणून मी तिला मारले आहे’ असे  अनमुद्दीनने आयानला सांगितले.  त्यानंतर तुझ्या मामाला फोन कर असे सांगत अनमुद्दीन घराच्या बाहेर निघून गेला. घाबरलेल्या आयान मामाला फोन करण्यापूर्वी घटनेची माहिती घर मालकाला दिली. त्यानंतर घरमालक व उपस्थित नागरिकांनी जैनबी यांना रुग्णवाहिकेतून वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. परंतु तपासण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मुलीवरून होता वाद

मृत जैनबी आणि आरोपी अनमुद्दीन यांच्यामध्ये मुलगी तमन्ना हिच्यावरुन वाद होता. मुलगी तमन्ना ही मागील काही दिवसांपूर्वी मोहम्मद इलियाज शाह या मुलासोबत पळून गेली होती. त्यानंतर जैनबी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर तमन्नाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र मुलीच्या केसमध्ये मला फसवत असल्याचा आरोप पतीकडून केला जात होता.

Video: ‘ही शिक्षिका काळी आहे, ती मला चिडवते’, म्हणत विद्यार्थिनीने शिक्षिकेवर हात उचलला, अमेरिकेतील वर्णभेदाची आणखी एक कहाणी

भाजप खासदाराला दहशतवाद्यांची ”गंभीर” धमकी, पोलीस बंदोबस्तात वाढ

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.