AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?

पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते पाच आठवड्यात चार लाखांहून अधिक एलपीजी कनेक्शनचे पीएनजीत रुपांतर झाले आहे.या काळात ४.४१ लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहे. सरकारने एलपीजीचा आणि क्रुड ऑईलचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.पीएनजीचा वापर वाढण्यासाठी सरकारने नवे धोरण आणले आहे.

दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
LPG TO PNG Converted
| Updated on: Apr 10, 2026 | 9:38 PM
Share

पश्चिम आशियातील तणावादरम्यान सरकारच्या वतीने दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी माहिती दिली आहे की गेल्या पाच आठवड्यात ४ लाखाहून जास्त एलपीजी कनेक्शनना पीएनजीमध्ये बदलले आहे. यासोबत दर दिवसी सुमारे १ लाख ५ किलोवाले सिलिंडर देखील दिले जात आहेत. या शिवाय याच काळात ४ लाख ४१ हजार नवीन ग्राहकांनी पीएनजीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

एलपीजी पुरवठ्यावर सरकारला विश्वास

पेट्रोलियम मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी सचिव सुजाता शर्मा यांनी एका इंटर-मिनिस्टेरियल प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितले की घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य झाला आहे आणि डिस्ट्रीब्युटर्सजवळ पर्याप्त स्टॉक उपलब्ध आहे. त्यांनी हे देखील सांगितले की देशात एलपीजीचे उत्पादन वाढवण्यात आले आहे.

सरकारने हे देखील स्पष्ट केले की देशात क्रुड ऑईलचा पुरेसा साठा आहे. आणि कोणत्याही प्रकारची तात्काळ टंचाईची स्थिती नाही.यामुळे ऊर्जा सुरक्षेसंदर्भात चिंता कमी झालेली आहे.

पश्चिम देशातील संकटानंतर पीएनजीवर जोर देणार

मार्चमध्ये पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाल्याने एलपीजी सिलिंडरची टंचाई पाहायला मिळत आहे. यानंतर सरकारने घरगुती आणि कमर्शियल युजर्सना पीएनजीकडे वळवण्यास जोर लावला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या भागात पाईपलाईनचे नेटवर्क उपलब्ध आहे, तेथे पीएनजी कनेक्शन घेणे अनिवार्य असणार आहे. जर कोणत्याही ग्राहकांनी तीन महिन्याच्या आत पीएनजी कनेक्शन घेतले नाही तर त्याचा एलपीजी पुरवठा बंद केला जाईल. मात्र, जेथे तांत्रिक कारणाने पाईपलाईन देणे शक्य नाही, तेथे एनओसीच्या आधारावर एलपीजी पुरवठा सुरु राहू शकतो.

एलपीजी सोडण्यासाठी पोर्टल जारी

सरकारने एक पोर्टल सुरु केले आहे. जेथे पीएनजी घेणारे ग्राहक एलपीजी सोडण्याची इच्छा जाहीर करु शकतात. यानंतर गॅस एजन्सी घरातून सिलिंडर परत घेणार आणि सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड करेन. २४ मार्च रोजी जारी केलेल्या नव्या ऑर्डर अंतर्गत पाईपलाईनचा वेगाने विस्तार करणे, मंजूरीची प्रक्रिया सोपी करणे आणि एलपीजी वरुन पीएनजीमध्ये बदल करण्यास प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे.

इंडस्ट्रीला कमी, घरांना जास्त गॅस

केंद्र सरकारने घरगुती उपयोग आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरसाठी गॅस पुरवण्यास प्राथमिकता दिली आहे. पीएनजी आणि सीएनजी सेगमेंटला संपूर्ण पुरवठा केला जात आहे.तर इंडस्ट्रीला सरासरी ८० टक्के गॅस दिला जात आहे. पुरवठा सुरळीत राखण्यासाठी अतिरिक्त एलएनजी कार्गो देखील मागवण्यात आले आहेत.

Follow Us
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!